esakal | 'डीपी'तील 122 विद्यार्थ्यांना नोकरीची 'प्लेसमेंट'; टाटा कंपनीत निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Consultancy Services

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळालीय.

'डीपी'तील 122 विद्यार्थ्यांना नोकरीची 'प्लेसमेंट'

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : शेतकरी (Farmers), शेतमजुरांच्या कुटुंबातील खेड्यातून ज्ञानार्जनासाठी कोरेगावात येणाऱ्या तब्बल 122 विद्यार्थ्यांना डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या माध्यमातून ‘प्लेसमेंट’द्वारे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये (Multinational Company) नोकरीची संधी मिळाली आहे. त्याशिवाय महाविद्यालयातील २१ विद्यार्थी पोलिस व सैन्य दलामध्ये भरती झालेत. या विद्यार्थ्यांनी चिकाटीने घेतलेली मेहनत व त्यासाठी ज्ञानदानासोबतच महाविद्यालयाकडून राबवण्यात येत असलेल्या नोकरीसंदर्भातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमुळेच हे शक्य झाले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९- २० या शैक्षणिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या मल्टिनॅशनल कंपनीच्या हिंजवडी (पुणे) येथील युनिटमध्ये बिझनेस प्रोसेस सर्व्हिस या पदासाठी महाविद्यालयातील १२२ विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली आहे. देशभरातून ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीद्वारे ही प्लेसमेंट झाली आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या एकूण संख्येच्या सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.

हेही वाचा: आपल्याला नागरी हक्क माहिती आहेत? जाणून घ्या महत्वपूर्ण माहिती

DP Bhosale College

DP Bhosale College

महाविद्यालयातील ‘प्लेसमेंट ड्राईव्ह सेल’तर्फे दर वर्षी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील पदवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा व विविध कंपन्यांमधील नोकरीसाठी तयारी करून घेण्याचा कार्यक्रम राबवला जातो. त्याचेच यश म्हणून या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट व स्कील डेव्हलपमेंट सेलचे समन्वयक डॉ. एन. डी. निकम, प्रा. एस. यु. कसगावडे, डॉ. विजयकुमार कोष्टी यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, २०१९- २० मध्ये महाविद्यालयातील २१ विद्यार्थी पोलिस व सैन्य दलामध्ये भरती झालेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड, प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

loading image
go to top