भविष्य नोकऱ्यांचे  : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संधी 

डॉ. आशिष तेंडुलकर 
Thursday, 4 June 2020

गेल्या आठवड्याचा लेख वाचल्यानंतर आमच्या एका जुन्या स्नेहींचा दूरध्वनी आला की विदा वैज्ञानिक किंवा कृत्रिमबुद्धिमत्ता तज्ज्ञ होण्यासाठी कोणत्या प्रकारचे मूलभूतशिक्षण आवश्यक आहे,त्याविषयी चर्चा करूया

कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्षेत्र कोणत्याही शिक्षण प्रांतात किमान पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी खुले आहे. पदवीपर्यंतच्या शिक्षणाची अट अशासाठी ठेवली आहे की, त्यापर्यंतच्या शिक्षणात मूलभूत गणित, सांख्यिकी आदींची किमान तोंडओळख असते. तसेच, प्रश्‍न समजून घेण्याची कुवत आणि तो मांडण्याची किमान क्षमता अशा उमेदवारांच्या ठायी असते. आता पुढचा नैसर्गिक प्रश्‍न असा येतो की, हे शिक्षण नेमके घ्यायचे कुठे? किंवा या विषयाची तोंडओळख कशी करून घ्यायची.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या लेखात आपण याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. ‘ए आय फॉर एव्हरीवन’ हा प्राध्यापक अँड्रू इंग यांचा कोर्सेरा या संकेतस्थळावरचा विषय फारच उपयुक्त आहे. यामध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची सोप्या शब्दांत ओळख करून दिली आहे. हा विषय सर्वांसाठी खुला आहे. वय, शिक्षण या कशाचीही अट नाही. या नंतर अँड्रू यांचाच मशीन लर्निंग हा विषय तुम्ही करू शकता. हा विषय जगातील लाखो लोकांनी केला आहे. 

भविष्य नोकऱ्यांचे : कृत्रिम बुद्धिमत्तेतील नोकऱ्या आणि मुलाखती

व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. यामुळे येऊ घातलेल्या नवीन बदलांची माहिती आणि या तंत्राला आपापल्या व्यवसाय क्षेत्रात कसे वापरता येईल याचे आडाखे बनविता येतील. या तज्ज्ञांना कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांची तोंडओळख पुरेशी आहे. या संबंधीचे प्रश्‍न कसे मांडावेत, त्यासाठी आवश्यक तालीम संच कसे तयार करावेत, नेमक्या कोणत्या तंत्राच्या साहाय्याने आपला प्रश्‍न सोडविला जाईल याचा अंदाज येतो. त्यामुळे या तंत्राच्या क्षमतेविषयीची अवास्तव कल्पना किंवा याने काहीच करता येणार नाही अशी नकारात्मकता या दोन्हीपासून समतोल असा दृष्टिकोन तयार होण्यास मदत होते. एकदा का प्रश्‍नांची मांडणी करून झाली की, आपण संगणक तज्ज्ञांच्या मदतीने अशी प्रणाली सहज तयार करून घेता येते. अशी प्रणालीची चाचणी कशी करायची आणि त्यामधून मिळणाऱ्या उत्तरांचा कसा वापर करायचा याविषयी आपण मागील काही लेखात चर्चा केलीच आहे. पुढील भागात आपण व्यवसाय तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय कसा समजून घ्यावा याविषयी मांडणी करूया. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ashish tendulkar article about Opportunities in artificial intelligence

Tags
टॉपिकस
Topic Tags: