डिजिटल स्किल : डिजिटल संसाधने आणि कौशल्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digital Skills

जलद आणि व्यापक डिजिटलायझेशनमुळे कामाचे स्वरूप बदलले आहे. डिजिटल संसाधने (टूल्स) आणि कौशल्ये आता आवश्यक मानली जात आहेत.

डिजिटल स्किल : डिजिटल संसाधने आणि कौशल्ये

जलद आणि व्यापक डिजिटलायझेशनमुळे कामाचे स्वरूप बदलले आहे. डिजिटल संसाधने (टूल्स) आणि कौशल्ये आता आवश्यक मानली जात आहेत. वर्क फ्रॉम होम संस्कृतीत युवकांना नवीन तंत्रज्ञानासह कार्य करण्यासाठी आणि वेगवान तांत्रिक प्रगतीसह डिजिटल प्रवाहांबद्दल अद्ययावत राहणेही महत्त्वाचे झाले आहे. डिजिटल कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची मागणी जास्त असली तरीही अशा अद्ययावत मनुष्यबळाची कमतरता आहे. डिजिटल परिवर्तन (ट्रान्सफॉर्मेशन) स्थापित करण्यासाठी आवश्यक ‘कौशल्य कार्यसिद्धी’कडे यामुळेच सजग दृष्टीने पाहणे ही काळाची गरज आहे.

डिजिटल आणि सामाजिक असमानता डिजिटल कौशल्ये विकसित करण्याच्या संधींवर परिणाम करतात. केवळ पारंपरिक शिक्षण पद्धती डिजिटल कौशल्यांसाठी औद्योगिक आस्थापनांच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत यामुळेच डिजिटल कौशल्यांवर आधारित रोजगार क्षमता विकसित करून स्पर्धेच्या युगात टिकणे सहज शक्य आहे.

अलीकडे शिक्षण-प्रशिक्षणामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर पहिल्या मल्टिमीडिया सामग्रीपासून ते संगणक-आधारित आणि इंटरनेटद्वारे कनेक्टेड शिक्षणापर्यंत सर्रासपणे केला जात आहे. मासिव्ह ऑनलाइन ओपन कोर्सेस (मुक्स), लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), मोबाईल लर्निंग (मोबाईल फोनद्वारे शिक्षण प्रशिक्षण), गेमिफिकेशन (संगणकीय खेळातून कौशल्य विकास) ही शिक्षण विकासासाठी शक्तिशाली साधने बनली आहेत. ही संसाधने (टूल्स) तसेच अन्य उपकरणे वापरण्याचे कौशल्य डिजिटल स्किल्समध्ये समाविष्ट आहे.

तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी संवाद, प्रशिक्षण करण्याच्या माध्यमासाठी शैक्षणिक तंत्रज्ञान (एज्युकेशनल टेक्नॉलॉजी) आणि सूचना आरेखनाचे ज्ञान (इन्स्ट्रक्शनल डिझाईन), डिजिटल पेडॉगॉजिकल डिझाईन (अध्यापन शास्त्र) आदी अद्ययावत कौशल्ये ही ऑनलाइन जगताची प्रमुख आकर्षण बनलेली आहेत.

शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वर्तमान आणि भविष्यात व्हर्च्युअल क्लासरूम, फ्लिप क्लासरूम, हायब्रीड लर्निंग आणि ई-लर्निंग पोर्टल्स हे ऑनलाइन जगताचे महत्त्वाचे घटक बनले असून परस्पर संवादी चित्रफितींद्वारे (इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ) तंत्रज्ञान संवाद हा शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात येत्या काळात वर्चस्व गाजवेल. ई-लर्निंगची लोकप्रियता आणि उपयोगिता सातत्याने वाढत आहे. बिझनेस वायरच्या एका अभ्यासानुसार भारतामध्ये ई-लर्निंग मार्केट २०२० आणि २०२४ दरम्यान १४.३३ अब्ज डॉलरने वाढणार आहे.

मुक्स प्लॅटफॉर्म हे डिजिटल कौशल्यवधीसाठी आयुष्यभर शिकण्याच्या ट्रेंडमध्ये योगदान देत आहेत. मुक्स हे यापुढील काळात अल्पमुदतीच्या (मायक्रो क्रेडिट)अनेक कौशल्याधारित कला, हस्तकला, ​​बागकाम इ. सारख्या विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी युवकांना आकर्षित करू शकतात असे अनेक मुक्स प्लॅटफॉर्म कला, संगीत आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसह अन्य अनेक कोर्सेसही सादर करत आहेत.

मोबाईल लर्निंगमध्ये लक्षणीय सुधारणांचा वेग सर्वाधिक आहे. यामध्ये गेमिफिकेशन, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, व्हर्चुअल रिअॅलिटीसह शिक्षण-प्रशिक्षण क्षेत्रात आपली वाटचाल करत आहेत. हे तंत्रज्ञान परस्परसंवादी सामग्री (इंटरॲक्टिव्ह कन्टेन्ट) आणि सहयोगी कार्यसिद्धी (कोलॅबरेटीव्ह वर्क)प्रदान करून विद्यार्थ्यांच्या सहभागाला चालना देत असल्याने या पुढील काळात या क्षेत्रातील तंत्रज्ञांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासणार आहे.

डिजिटल ट्रेनिंगमध्ये क्रांती

मॉडर्न लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) ही अहवाल साधनांसह (रिपोर्टिंग टूल्स) कार्यान्वित आहे जे शिक्षकांना- प्रशिक्षकांना डेटावर आधारित निर्णय घेण्यास आणि शिकण्याची प्रक्रिया सुधारण्याची सुविधा उपलब्ध करून देतात त्यामुळे डिजिटल ट्रेनिंग क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली आहे. औद्योगिक आस्थापनांच्या अनेक कार्यात याचा कौशल्यासह वापर करणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती ही त्यामुळे गरजेची झाली आहे.

Web Title: Dr Deepak Tatpuje Writes Digital Resources And Skills

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobSkills
go to top