मनातलं : डोळसपणे करा निवड...

दर वर्षी जून-जुलै महिन्यादरम्यान सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग यांना कायम भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे करिअरची निवड करणे.
Success
SuccessSakal
Summary

दर वर्षी जून-जुलै महिन्यादरम्यान सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग यांना कायम भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे करिअरची निवड करणे.

दर वर्षी जून-जुलै महिन्यादरम्यान सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी वर्ग, पालकवर्ग यांना कायम भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे करिअरची निवड करणे. अनेक क्षेत्रांत करिअरची नवीन दालने निर्माण होत आहेत. करिअरची निवड करताना आपली आत्यंतिक आवड व क्षमता या दोन मूलभूत घटकांचा विचार अत्यावश्‍यक ठरते. बदललेल्या गतिमान स्पर्धात्मक जीवनशैलीत पालकांच्या महत्त्वाकांक्षा, दिवास्वप्ने, अवास्तव अपेक्षा यामुळे करिअर निवड, आवड व क्षमता या गोष्टींकडे अनेक वेळा दुर्लक्ष होते आणि शेवटी यशप्राप्ती दुरापास्त होते. यामुळे करिअर वेध घेताना अनेक पर्यायांची उपलब्धता असल्याने योग्य तो निर्णय घेणे काहीसे अवघड होते. त्यासाठी काही बाबींचा विचार होणे आवश्‍यक ठरते.

  • विद्यार्थ्यांचा कल पाहून निर्णयाप्रत येणे.

  • कल आजमावण्यासाठी कौटुंबिक पातळीवर प्रथम सखोल चर्चेद्वारे विचार विनिमय करणे.

  • करिअरसंबंधित विद्यार्थी व क्षमता या निकषांद्वारे करिअर निवडीचे स्वातंत्र्य द्यावे.

  • विद्यार्थी-पालक यांच्यात सुसंवाद असावा.

  • पारिवारिक वातावरण, आर्थिक बाजू, बौद्धिक क्षमता या घटकांचाही करिअर निवडीपूर्वी सखोल विचार व्हावा.

  • करिअर पूर्ततेसाठी आवश्‍यक वाटल्यास कोणकोणती आर्थिक संसाधने होऊ शकतात याचाही प्राथमिक विचार करणे योग्य ठरते.

  • अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमके कोणते ध्येय निवडायचे याबाबत स्वतःच्या निर्णयक्षमतेचा वापर करावा.

  • निवडीच्या करिअरमध्ये अपेक्षित यशप्राप्ती न झाल्यास अन्य पर्यायांची चाचपणी करणे प्रसंगी पर्याय स्वीकारण्याची मानसिक तयारी ठेवावी.

  • करिअर निवडीच्या वेळेस आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास गोंधळ निर्माण होत नाही व निर्णय ठाम राहतात.

  • नवनवीन उपलब्ध असणाऱ्या विद्याशाखांबद्दल माहितीचे संकलन करणे.

  • आपल्या आवडीनुसार कार्यक्षेत्र निवडताना संबंधित असणाऱ्या प्रवेश परीक्षांबाबत माहितीचे संकलन करावे.

  • विविध माध्यमांद्वारे करिअर नियोजन मार्गदर्शन शिबिराच्या आयोजनास उपस्थित राहणे, करिअर क्षेत्रातील संधींची चर्चा करणे.

  • प्रत्येकास आपण काही तरी वेगळे करण्याची इच्छा असते; परंतु तशी मनाची तयारी झालेली नसते. त्यामुळे करिअर निवडताना इतर पर्यायांच्या प्रभावामुळे आपले विचार, आवड महत्त्वाची ठरते.

  • आपल्या परीक्षेच्या निकालाप्रमाणे अनेक वेळा योग्य त्या शाखेची निवड करणे महत्त्वाचे ठरते.

  • विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना रोजगाराभिमुख उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दिल्याने करिअरची यशस्वीरीत्या निवड होते.

  • व्यावसायिक शिक्षणामध्ये अनेक प्रात्यक्षिक बाबींचा समावेश असतो. त्यामुळे प्रात्यक्षिक शिक्षणाद्वारे करिअर क्षेत्रात यशप्राप्ती वेगाने होते.

  • तंत्रशिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पारंपरिक शिक्षणातील करिअरची निवड करताना प्रारंभी आवश्‍यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे.

  • आपल्या बुद्धिमत्ता क्षमतेच्या बरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा.

  • स्वतंत्र कौशल्य आधारित करिअर निवड करावी. उदा. खेळ, गायन, केटरिंग, स्पर्धा परीक्षा, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा विचार होऊ शकतो.

  • गुणांची टक्केवारी, पारंपरिक व्यवसाय एकत्रित विचार करून करिअर निवड करणे हे महत्त्वाचे नसते, तर तांत्रिक कौशल्ये, आवड व क्षमता या आधारभूत बाबी आहेत.

  • तज्ज्ञ, सुशिक्षित लोकांची मदत व मार्गदर्शन घ्या.

  • करिअर निवडीचे इतरांचे अनुकरण करू नका.

करिअर निवड ही गांभीर्याने घेण्याची विचारप्रक्रिया आहे. विद्यार्थी दहावी, बारावीच्या तत्त्वावर त्याची करिअर निर्मिती सामान्यतः गुणप्रतीच्या आधारे केली जाते. गुणांच्या टक्केवारी आधारित करिअर निवडीच्या सूचनेनुसार काही लोकांची जीवनशैली उदा. डॉक्‍टर, वकील, अभिनेता यांचा मनावर प्रभाव हे महत्त्वाचे ठरतात.

इतरांच्या प्रभावाखाली निवडलेले करिअर धोक्‍याच्या वळणावर घेऊन जाते. त्यामध्ये वेळ, पैसा, शक्ती वाया जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com