करिअर अपडेट : पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrolium engineering

बारावीनंतर उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एम महत्त्वाचा म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग.

करिअर अपडेट : पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील संधी

- प्रा. डॉ. मीनल देशमुख

बारावीनंतर उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एम महत्त्वाचा म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग. उत्तम निरीक्षण शक्ती, शास्त्रीय दृष्टिकोन, उच्च दर्जाची आकलन क्षमता व सृजनशीतला असलेला विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात. तेल आणि वायु यांचे नैसर्गिक स्रोत शोधून काढणे, त्यांची तपासणी करण्याचे काम पेट्रोलियम इंजिनिअरला करावे लागते. संबंधित कामासाठी लागणारी वेगवेगळी यंत्रसामग्री शोधून काढणे, विकसित करणे आणि जास्तीत जास्त तेल किंवा वायू जमिनीच्या पोटातून जमिनीवर आणणे हे पेट्रोलियम इंजिनिअरिंगचे काम आहे.

मागील शंभर वर्षात तेल आणि वायू यांच्या उत्खनन आणि निर्मितीचा डेटा मोठ्याप्रमाणात उपलब्ध आहे. या उपलब्ध माहितीची संगणकीय पद्धतीने चिकित्सा करून उत्पादन वाढीसाठी परिस्थितीनुसार किफायतशीर निर्णय घेणे हे आव्हान सध्या सर्व मल्टिनॅशनल ऑइल अँड गॅस कंपन्यांसमोर आहे. डेटा हॅडलिंगची माहिती म्हणजेच आर्टिफिशिअल इंटलिजंस आणि मशिन लर्निंगचे कौशल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी वाढत आहे. पेट्रोलियम इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट वाढलेली आहे. मुलींसाठीही या क्षेत्रात प्रचंड संधी आणि सरकारी, खासगी तेल कंपन्यामध्ये आरक्षित जागा आहेत. महिलाही या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि महिलांसाठी ऑफिस जॉबही उपलब्ध आहेत.

पेट्रोलियम शाखा का?

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी अगदी पदवीनंतरच.

  • सरकारी खासगी तेल कंपन्यांमध्ये असणारे गलेलठ्ठ पगार.

  • संशोधन आणि विकासामधील प्रचंड वाव.

  • जगभ्रमंतीची संधी.

  • आव्हानात्मक करिअरच्या संधी

नोकरीची संधी

१) ओ.एन.जी.सी. २) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ३) आयबीपी कॉर्पोरेशन लिमिटेड, ४) ऑइल इंडिया लिमिटेड, ६) एलपीजी, ७) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, ८) रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड, ९) एस्सार ऑइल अँड गॅस, १०) गेल, ११) स्लबर्जर, १२) केन, १३) शेल गॅस, १४) एक्‍इाॉन मोबील.

पात्रता

शास्त्र शाखेतून बारावी केल्यानंतर पेट्रोलियम इंजिनिअरिंग मध्ये बी.टेक, बी.ई करता येते. नंतर एम.ई,एम.एस. आणि पीएचडी ही करता येते. मेकॅनिकल, केमिकल, पेट्रोकेमिकल, पॉलिमर या शाखेत पदविका (डिप्लोमा) केलेले विद्यार्थी बी. टेक. पेट्रोलियमला थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ शकतात.

(लेखिका एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत (पुणे) असिस्टंट प्रोफेसर आहेत.)

Web Title: Dr Minal Deshmukh Writes Career Updates Opportunity In Petrolium Engineering

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..