हेल्थ केअर : मोबाईल डॉक्टर...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्थ केअर : मोबाईल डॉक्टर...!
हेल्थ केअर : मोबाईल डॉक्टर...!

हेल्थ केअर : मोबाईल डॉक्टर...!

दहा-पंधरा वर्षांपूर्वी कोणी आपल्याला सांगितले असते आपण हातात असलेला मोबाईल एक दिवस आपली बँक असेल. आपल्या सर्वांना ही अविश्वसनीय वाटणारी कल्पना आज सत्यात उतरली आहे. यामागे गेल्या दोन दशकातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात झालेलं संशोधन आणि तंत्रज्ञान विकास याचा हात आहे. आज अगदी सर्वसामान्य कला, वाणिज्य क्षेत्रातील पदवीधरही मोबाईल बँकेचे तंत्रज्ञान सहज वापरू शकतो आणि याच क्षेत्रात या पदवीधर कुशल विद्यार्थ्यांना अनेक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

मोबाईलवरच प्रिस्क्रिप्शन

कोरोनानंतरच्या जगात हाच मोबाईल आपला डॉक्टर असेल. आज ही कल्पना वाटत असली, तरी येणाऱ्या काही वर्षात आपला मोबाईल हाच आपला फॅमिली डॉक्टर होऊन जाईल. आणि या क्षेत्रात सर्व प्रकारच्या कुशल कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असेल. आपल्याला दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस सर्दी, ताप किंवा खोकला असेल आणि फार्मासिस्टने दिलेली औषधे उपयोगी पडत नसतील तर आपण शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला जाणवणाऱ्या लक्षणांवरून औषधे देतो त्याचा मात्र फरक दिसून येतो. हे एक प्रकारचे डॉक्टरांचे कौशल्य असते जे फार्मासिस्टकडे नसते. येणाऱ्या काही दिवसांत माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हेच कौशल्य आपल्या हातातील मोबाईलकडे आलेले असेल. उदाहरणच द्यायचे झाले तर दिवसातून कमीत कमी ५० पेक्षा अधिक वेळा आपण आपला मोबाईल आपल्या हातात घेत असतो.

जगभरातील अनेक शास्त्रज्ञ सध्या अशा प्रकारचे सेन्सर्स विकसित करत आहेत, जे आपल्या हाताचे तापमान तात्काळ ओळखू शकतील. हेच सेन्सर्स मोबाईलवरती असतील. सकाळी ज्या वेळी आपण मोबाईल हातात घेऊ तेथून ते रात्रीपर्यंत ठराविक कालावधीत आपला मोबाईलच आपल्या हाताचे तापमान दाखवत जाईल, एवढेच नाही तर शरीराच्या तापमानात थोडा जरी बदल झालं तर तेही आपल्याला लगेच मोबाईलवरतीच दिसेल. या सध्या तंत्रज्ञानाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मशिन लर्निंगची जोड दिली जाईल आणि हे शरीराचे बदलणारे तापमान पुढे सर्दी तापामध्ये कधी बदलेल हेही मोबाईलवरच समजेल. त्याहीपुढे हाच मोबाईल आपल्याला कोणती औषधे घ्यावी लागतील याचीही माहिती देईल.

ज्या प्रकारे डॉक्टर आपल्याला मेडिकल स्टोअरमधून औषधे घेण्याचे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, त्याच प्रकारे आपल्याला मोबाईलवरच आपल्याला औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान सर्वसाधारण सर्दी-ताप किंवा खोकला ते वेगवेगळ्या विषाणुजन्य आजारांमुळे होणार न्यूमोनिया तसेच मधुमेह, उच्च किंवा कमी रक्तदाब यासारख्या आजारांवरही विकसित होईल. याचा फायदा लाखो लोकांना घरबसल्या होईल. ज्या प्रकारे मोबाईल बँकिंग सुरक्षित आणि बहुपयोगी असते त्याच प्रकारे मोबाईल डॉक्टर तंत्रज्ञानसुद्धा असेल. या नवीन येणाऱ्या क्षेत्रात फक्त मेडिकल डॉक्टर्स किंवा फार्मसी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच संधी नसेल तर इतर सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही निर्माण होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या नेहमीच्या अभ्यासाबरोबरच पब्लिक हेल्थ म्हणजेच सार्वजनिक आरोग्य, औषधनिर्माण शास्त्र आणि महत्त्वाचे म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग याचेही ज्ञान घेणे आवश्यक आहे. कोरोनानंतरच्या जगात सेवा क्षेत्रात सर्व प्रकारच्या पदवीधरांना ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरीचा आणि स्वतःच्या स्टार्टअपसाठी ही सर्वांत मोठी संधी असेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top