न्यू नॉर्मल : भारताची ‘विकास की रेल’

भारतीय रेल्वेमधील महत्त्वाच्या बदलांमुळे रेल्वे दळणवळणाचे साधन न राहता देशाचे जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मक स्थान राखण्यासाठी महत्त्वाचा घटक बनली आहे.
indian railway
indian railwaysakal
Summary

भारतीय रेल्वेमधील महत्त्वाच्या बदलांमुळे रेल्वे दळणवळणाचे साधन न राहता देशाचे जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मक स्थान राखण्यासाठी महत्त्वाचा घटक बनली आहे.

भारतीय रेल्वेमधील महत्त्वाच्या बदलांमुळे रेल्वे दळणवळणाचे साधन न राहता देशाचे जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मक स्थान राखण्यासाठी महत्त्वाचा घटक बनली आहे. भारतीय रेल्वेने राष्ट्रीय रेल्वे योजना-२०३० हाती घेतली आहे. भविष्यासाठी सक्षम रेल्वे प्रणाली २०३०पर्यंत तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. भारताला २०३०पर्यंत जगातील सर्वांत मोठी हरित रेल्वे हवी आहे. त्यादृष्टीने २०३०पर्यंत संपूर्ण आधुनिकीकरणाचा आणि कार्बनच्या शून्य उत्सर्जनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.

भारतीय रेल्वे ईस्टर्न

वेस्टर्न फ्रेट कॉरिडॉरसाठी १५० मॉडर्न रेल्वे स्टेशनचा विकास करणार आहे. रेल्वे पार्सल, पोस्ट, गोदाम अशा सुविधा एका छताखाली मिळाव्यात या हेतूने स्वतंत्र इमारतींची निर्मिती करणार. रेल्वे लाइनच विद्युतीकरण, २९०४ किमीचे रेल्वे रूळ गेज बदलणे, दुहेरी वाहतूक ६००० हुन अधिक रेल्वे स्टेशन वर मोबाईल हॉट-स्पॉट, ९६० रेल्वे स्टेशनवर सोलर पॅनेल लावले जाणार आहेत.

२०२०-२१मध्ये आजपर्यंतची सर्वात जास्त म्हणजे ११०० इंजिनांची निर्मिती करण्यात आली. मागील पाच वर्षाच्या काळात सरकारने उत्तर-पूर्वे कडील राज्यांमध्ये लक्षणीय कामगिरी केली. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्यांच्या राजधान्या ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कने जोडल्या गेल्या आहेत.

बोगी बिल पुलाची बांधणी झाल्याने इटानगर ते दिब्रुगड हा प्रवास २४ तासाहून ५ तासावर आला. १४१ मीटर उंचीवर जगातील सर्वात उंच पूल मणिपूर येथे तयार होतो आहे. तो महत्त्वाकांक्षी जिरीबाम-इंफाळ रेल्वे मार्ग प्रकल्पाचा भाग आहे. हा पूल युरोपमधल्या माँटेनेग्रो, ‘माला-रिजेका’ व्हायाडक्टच्या १३९ मीटरच्या पुलाचे रेकॉर्ड मागे टाकेल.

आंतरराष्ट्रीय रेल मैत्री

आंतरराष्ट्रीय रेल्वे मालवाहतूक मार्गांच्या विस्तारासाठी भारताचे भौगोलिक स्थान आणि रेल्वे मालवाहतूक क्षमता हे दोन फायदेशीर घटक आहेत. भारतात न्हावा शिवा, मुंद्रा सारखी मोठी कंटेनर बंदरे आहेत. भारताची निर्यात क्षमता वाढत असून यात आंतरराष्ट्रीय रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर अधिक सक्रिय भूमिका बजावू शकते. आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर हा भारत, इराण, अझरबैजान आणि रशियाला जहाज, रेल्वे आणि रस्त्यांद्वारे जोडणारा ७,२०० किलोमीटर लांबीचा मालवाहतूक मार्ग आहे. या मार्गाने मुंबई आणि मॉस्को दरम्यानचा प्रवासाचा कालावधी चाळीसवरून चौदा दिवसांपर्यंत कमी केला आहे. या कॉरिडॉरचा मुख्य उद्देश म्हणजे सुएझ कालवा आणि भूमध्यसागरीय आणि बाल्टिक समुद्राद्वारे समुद्रमार्गे पारंपारिक मार्गाने पर्याय प्रदान करणे. भारतासाठी अशा आंतरराष्ट्रीय मार्गात सहभागी होणे हे मोठे यश आहे. प्रामुख्याने सुएझ कालवा वगळताना अनुक्रमे रशिया आणि युरोपमध्ये जलद प्रवेशासाठी रेल्वेचा वापर करता येईल.

युरोप आणि विशेषतः फिनलँडमधून भारताकडे जाणारी पहिली ट्रेन ट्रीप सध्या प्रगतिपथावर आहे. ट्रेन २१ जून रोजी हेलसिंकी येथून निघाली आणि अझरबैजान आणि इराणमधील सीमा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. फिनलंड आणि भारत दरम्यान एकूण वेळ सुमारे २२ दिवसांचा असल्यामुळे मार्ग आणखी स्पर्धात्मक होईल. खाफ-हेरात रेल्वेमार्ग सुरू करण्यात भारत सक्रिय आहे. अफगाणिस्तानशी आपले संबंध वाढवण्याच्या आणि देशाला इतर महत्त्वाची ठिकाणे, प्रदान करण्याच्या उद्देशाने प्रकल्पाच्या एकात्मतेत सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘रेल्वे मैत्री’ व्यापारासाठी महत्त्वाची असून भारत वेगाने प्रभाव पडत आहे. वेगाने बदलत चाललेली भारताची ‘विकास की रेल’ अशक्यप्राय पसरलेल्या या रेल्वे दळणवळणाच्या कर्तृत्वाला सलाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com