न्यू नॉर्मल : भारतीय रेल्वेचे ‘युनिव्हर्सल नंबर्स’

लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसाठी २०१० पर्यंत ४ अंकी योजना वापरली जात होती. त्यांना ‘युनिव्हर्सल नंबर्स’ म्हणून ओळखले जात होते.
Indian Railway
Indian RailwaySakal
Summary

लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसाठी २०१० पर्यंत ४ अंकी योजना वापरली जात होती. त्यांना ‘युनिव्हर्सल नंबर्स’ म्हणून ओळखले जात होते.

भारतीय रेल्वे अंतर्गत दररोज ११,००० गाड्या धावतात. त्यामध्ये ७,००० प्रवासी गाड्या, ७५६६ लोकोमोटिव्ह, ३७ हजारहून अधिक प्रवासी डबे, अडीच लाख मालवाहू वॅगन, ६८५३ रेल्वे स्थानके, ३०० यार्ड, २३०० पार्किंग शेड, ७०० दुरुस्ती वर्कशॉप्स, आणि १५ लाख ४० हजार मनुष्यबळ समाविष्ट आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या बरोबर भारतीय रेल्वे ही जगातील महत्त्वाच्या चार रेल्वेपैकी एक आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांसाठी २०१० पर्यंत ४ अंकी योजना वापरली जात होती. त्यांना ‘युनिव्हर्सल नंबर्स’ म्हणून ओळखले जात होते. प्रवासी गाड्यांच्या नंबरसाठी २० डिसेंबर २०१०पासून पाच-अंकी प्रणाली वापरण्यास सुरवात केली.

रेल्वेच्या क्रमांकाचा पहिला आकडा कुठल्या प्रकारातील प्रवासी रेल्वे आहे हे दर्शवतो. उदा - क्रमांक ०. शून्य आकड्याने सुरू होणारा गाडी नंबर विशेष (अल्पकालीन) गाड्या ज्या सण, उन्हाळी सुट्ट्या, परीक्षा किंवा आपत्कालीन परिस्थितीत होणारी गर्दी कमी करण्यासाठी तात्पुरत्या सुरू केलेल्या असतात. १२ किंवा २२ या पहिल्या दोन अंकांनी सुरू होणाऱ्या गाड्या सुपर फास्ट ट्रेन्स, एक्स्प्रेस असतात. लांब पल्ल्याच्या सुपर फास्ट एक्स्प्रेस गाड्यांचे क्रमांक ०१ पासून सुरू होतात.

देशातील सर्वांत मोठे उपनगरीय रेल्वे नेटवर्क म्हणजे कोलकता. त्यातल्या गाड्यांचे क्रमांक ३ या आकड्याने सुरू होतात. चेन्नई, नवीदिल्ली, हैदराबाद आणि इतर महानगरीय भागातील उपनगरीय गाड्या क्रमांक ०४ पासून सुरू होतात.

नेहमीच्या पॅसेंजर गाड्या क्रमांक ५ पासून सुरू होतात. क्रमांक ०६ पासून सुरू होणाऱ्या गाड्या या मेमू गाड्या. म्हणजे भारतातील शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या ‘मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ रेल्वे गाड्या. डिझेल इंजिनद्वारे चालणारी रेलकार सेवा म्हणजे DMU (DEMU) जी क्रमांक ७ ने सुरू होते.

क्रमांक ८ ने सुविधा एक्स्प्रेस (प्रीमिअम एक्स्प्रेस)चे क्रमांक सुरू होतात. रेल्वेने मंत्रालयाने २०१४ नंतर अत्यंत व्यग्र रेल्वे मार्गांवर सुविधा एक्स्प्रेस सुरू केल्या. क्रमांक ०९ ने सर्व मुंबई क्षेत्र उपनगरीय गाड्यांचे क्रमांक सुरू होतात.

रेल्वेच्या क्रमांकामधील दुसरा अंक झोनचे मुख्यालय (पूर्व, उत्तर, पश्चिम-मध्य) दर्शवतो आणि तिसरा अंक ट्रेनचे शेवटचे गंतव्यस्थान (हावडा, दिल्ली, मुंबई) दर्शवतो. तिसरा अंक जेथे रेल्वेची डागडुजी केली जाते ते रेल्वे क्षेत्र दर्शवतो. चौथ्या आणि पाचव्या अंकाच्या जागी कुठलाही आकडा येऊ शकतो, त्याला कुठले सूत्र नाही. हे आकडे पाच-अंकी रेल्वे क्रमांकाची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक रेल्वे क्रमांक वेगळा आणि विशिष्ट बनवतात.

रेल्वे गाड्यांना १८२०पासून नाव देण्याची पद्धत सुरू आहे. त्या-त्या राज्यातील विशेष व्यक्ती, जागा यावरून रेल्वेचे नाव ठरवले जाऊ लागले. इंदूर-तिरुअनंतपुरम मध्ये धावणारी अहिल्यानगरी एक्स्प्रेस.

जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वेगाड्या या अप आणि डाऊन क्रमांकांद्वारे दर्शविल्या जातात. डाऊन म्हणजे विभागीय मुख्यालयातून निघणारी गाडी, तर अप म्हणजे विभागीय मुख्यालयाकडे जाणारी गाडी. डाऊन गाड्यांची क्रमांक विषम संख्या असते तर अप गाड्यांची क्रमांक सम संख्या असते. अशाप्रकारे भारतीय गाड्यांचे वर्गीकरण मार्गावरील थांब्यांची संख्या, नेटवर्कवरील त्यांचे प्राधान्य आणि त्यांची भाडे रचना ठरवतात. ‘राष्ट्र की जीवन रेखा’ असं जिचं वर्णन केलं जात ती भारतीय रेल्वे. खऱ्या अर्थी आ-सेतू हिमाचल जोडणारी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com