न्यू नॉर्मल : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दिशेने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Unconventional energy

पॅरिस करार होत असताना मी या विषयाची आस्था असणारी भारतीय म्हणून पाहत होते.

न्यू नॉर्मल : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दिशेने

पॅरिस करार होत असताना मी या विषयाची आस्था असणारी भारतीय म्हणून पाहत होते. अर्थातच आपल्या मतांचा आदर ठेवून या गोष्टी करारामध्ये समाविष्ट झाल्या तेव्हा आनंद, समाधान व कौतुक वाटले.

याच परिषदेत आपण -

  • पर्यावरणपूरक शाश्वत जीवनशैली - शाश्वत जीवनशैली हा भारताच्या लोकाचाराचा गाभा आहे. परंपरा, संवर्धन आणि संयमाच्या मूल्यांवर आधारित निरोगी आणि पर्यावरणपूरक शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे व प्रचार आणि प्रसार करणे.

  • पर्यावरणपूरक विकास - आर्थिक विकासाच्या अनुषंगाने आतापर्यंत इतरांनी अनुसरलेल्या मार्गापेक्षा हवामान अनुकूल आणि स्वच्छ हरित मार्गाचा अवलंब करणे.

  • एकूण सकल देशांतर्गत उत्पादनाची उत्सर्जन तीव्रता कमी करणे - २००५ च्या तुलनेत अर्थव्यवस्थेतील उत्सर्जनाची तीव्रता ३३ ते ३५ टक्क्यांनी कमी करणे.

  • गैर-जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जानिर्मिती - जीवाश्म नसलेल्या इंधन स्रोतांचा वाटा वीज निर्मिती क्षमतेच्या ४० टक्क्यांपर्यंत वाढवणे.

  • जंगलनिर्मिती आणि वृक्षाच्छादनाद्वारे अतिरिक्त कार्बन सिंक तयार करणे.

  • नव्या पद्धतींशी जुळवून घेणे - हवामान बदलास असुरक्षित असलेल्या क्षेत्रांमध्ये, विशेषतः कृषी, जलसंपदा, हिमालयीन प्रदेश, किनारपट्टी, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांतील विकास कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक वाढवून हवामान बदलाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेणे.

  • आवश्यक संसाधन व निधी उभारणी - आवश्यक संसाधने आणि उपलब्ध संसाधनातील अंतर लक्षात घेऊन मन आणि अनुकूलन क्रियांच्या अंमलबजावणीसाठी विकसित देशांकडून देशांतर्गत आणि नवीन आणि अतिरिक्त निधी एकत्रित करणे. नूतनक्षम ऊर्जा स्रोतांचा वापर आणि कार्यक्षम ऊर्जावापर याद्वारे शेती,पाणी,आरोग्य असे मूलभूत प्रश्न सोडवले जातील आणि त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल

  • तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता वाढवणे - भारतातील अत्याधुनिक हवामान तंत्रज्ञानाचा जलद प्रसार करण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील अशा तंत्रज्ञानासाठी संयुक्त सहकार्यात्मक संशोधन आणि विकासासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्रेमवर्क तयार करणे.

भारतातील विविध राज्यांमध्ये पर्यावरणपूरक उपक्रमात सौरऊर्जेचा मोठा भाग आहे. आहेत त्यातला सर्वात मोठा भाग आहे. कोची इंटरनॅशनल विमानतळ येथे पहिल्यांदा पूर्णपणे सौर ऊर्जेचा प्लँट विकसित केला. त्यानंतर दिल्लीने वापर केला. गुजरातला २०१२ मध्ये गुजरात येथे मेहसाणा जिल्ह्यात नर्मदा कालव्यावर सौर पॅनेल उभारून त्याद्वारे एक मेगावॉट वीज निर्मितीचा पथदर्शक प्रकल्प सुरू झाला.

अलीकडेच नव्याने देशात अपारंपरिक ऊर्जेसंबंधी- बी.एस्सी हा पदवी अभ्यासक्रम दिल्ली, चेन्नई , तेलंगणा व महाराष्ट्र येथे सुरू झाला आहे.

भारतात या काही प्रमुख संस्था पर्यावरण क्षेत्रात काम करतात. इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकादमी(IGNFA), C.P.R.पर्यावरण शिक्षण केंद्र (CPREEC), सेंटर ऑफ एक्ससिलेन्स इन एन्व्हॉयरमेंट इकॉनॉमिक्स (CEEE), सेंटर फॉर एन्व्हॉयरमेंट मॅनेजमेंट ऑफ डिग्रेडेड इकोसिस्टिम (CEMDE) कार्यरत आहेत.

या चळवळीत ‘से नो टू प्लास्टिक’, ‘सेव्ह वॉटर’, ‘ग्रीन मूव्हमेन्ट’, ‘कार्बन फूटप्रिंट’, अशा विषयांवर अनेक संस्था काम करत आहेत.

‘नगर वन’सारख्या वनखात्याच्या योजना ही चांगल्याच रुजल्या आहेत. पुण्यातच वारजे येथे असा ‘नगर वन’ प्रकल्प २०१५ मध्ये सुरू झाला. उजाड असणाऱ्या टेकडीवर वृक्षारोपण करून ग्रीन झोन वाढविण्याचे काम करण्यात आले. आज तिथे ४० एकरांवर ९००० झाडे सुरक्षित आहेत, पाणी अडवले जाते, पक्षी येत आहेत, जैवविविधता जपली जात आहे. शहरात मोकळा श्वास घेण्याची जागा तयार झाली आहे.

Web Title: Dr Prachi Javadekar Writes Towards Unconventional Energy Generation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjob
go to top