esakal | करिअर ‘ती’चे : व्यवहाराची ‘वाणिज्य’
sakal

बोलून बातमी शोधा

Career

मागील लेखामध्ये आपण ‘आर्टस’ शाखेतील करिअर पाहिले. आता व्यवहार व आर्थिकदृष्ट्या ज्याचा अभ्यास जीवनात आवश्यक असतो- तो म्हणजे पैसा. याची गुंतवणूक कुठे करावी, बँक, पोस्ट व्यवहार व योग्य मार्गदर्शन म्हणजेच वाणिज्य शाखा.

करिअर ‘ती’चे : व्यवहाराची ‘वाणिज्य’

sakal_logo
By
डॉ. सुलभा नितीन विधाते

मागील लेखामध्ये आपण ‘आर्टस’ शाखेतील करिअर पाहिले. आता व्यवहार व आर्थिकदृष्ट्या ज्याचा अभ्यास जीवनात आवश्यक असतो- तो म्हणजे पैसा. याची गुंतवणूक कुठे करावी, बँक, पोस्ट व्यवहार व योग्य मार्गदर्शन म्हणजेच वाणिज्य शाखा. पारंपरिकदृष्ट्या बी. कॉम. झाल्यावर नोकरी न करता पोस्ट ग्रॅज्युएट होणे आवश्यक आहे. चांगल्या कॉलेजमधून C.A./ C.S. B.Com./ ICWA केले, तर उत्तम नोकरी किंवा व्यवसाय करू शकता. 

बँकिंग व मार्केटिंगचे शिक्षण उत्तम कॉलेजमधून केले तर उत्तम करिअर करता येते. काही मुलींना उपजतच छंद असतात. या छंदांचे रूपांतर करिअरमध्ये करू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कॉमर्सचा ओघतक्ता 

 • एम. बी. ए.
 • पी. जी. डी. एस.
 • सी. एस.
 • एम. सी. ए. 

या व्यतिरिक्त

 • सरकारी नोकरी 
 • बँकेतील नोकरी 
 • पैसा गुंतवणूक चांगल्या प्रकारे करावा याचा व्यवसाय 
 • बी.कॉम. इन ट्रॅव्हल अँड टुरिझम 
 • बी.कॉम. इन कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग - याला आता जास्त महत्त्व आहे. 
 • बी.कॉम. इन फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस 
 • परदेश व्यापार या विषयात पदव्युत्तर पदवी 

व्यवस्थापनातील ही महत्त्वाची शाखा आहे. विस्तारित व अतिशय महत्त्वाची जबाबदारी असलेले हे क्षेत्र आहे. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस इकॉनॉमिक, बिझनेस लाँ, बिझनेस स्टॅटिस्टिक या विषयांचा खोल अभ्यास करून सुंदर करिअर होऊ शकते. माहितीविना व मार्गदर्शनाच्या अभावी बी.कॉम. डिग्री घेऊन थांबणे योग्य नाही. आपली आवड, आपल्याला असलेला वेळ व योग्य शिक्षण/ कोर्स करून भरपूर पैसे मिळवता येतात. ॲक्सिस बँक, टीसीएस, आयबीएम, एचसीएल, हिंदुस्थान टाइम्स, मारुती सुझुकी व अन्य नामवंत कंपन्यांत काम करण्याची संधी मिळते. व्यापार, व्यवसाय, मार्केटमधील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारी वित्तीय धोरणे, शेअर मार्केट आदी बाबतीत मार्गदर्शन करू शकता. थोडक्यात खालील संकल्पना चित्रणाप्रमाणे वाणिज्य शाखेत संधी आहेत.

वाणिज्य शाखेतील संधी

 • वित्तीय अभियांत्रिकी 
 • कॉस्ट अकाउंटंट वित्तीय संस्था 
 • विमा क्षेत्र 
 • संशोधन
 • ब्रोकिंग 
 • नागरी सेवा 
 • अध्यापन 
 • बँकिंग क्षेत्र

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा 
१) बँक डिपॉझिट्‍स
२) म्युच्युअल फंड
३) स्टॉक मार्केट
४) व्हेंचर कॅपिटल
५) विमा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट

गुंतवणूक - या क्षेत्रात नवीन आव्हाने आहेत. फायनान्शियल प्लॅनर, ॲसेट मॅनेजर, रिसर्च ॲनालिस्ट, कमोडिटी मार्केट व करन्सी मार्केट, इन्शुरन्स सेक्टर यात प्रचंड संधी आहेत. हवी आहे ती कल्पकता. आपले इन्कम वाढविणे हे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच महत्त्वाचे आहे मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतविणे. यासाठी मुलींनो तुमचे ज्ञान अद्ययावतच  हवे. कधीतरी घेतलेली डिग्री इथे उपयोगात येत नाही, तर प्रचंड मेहनत, व्यवहारातील घडामोडी, मार्केटची गरज व त्यानुसार आपण देत असलेल्या सुविधा यामुळेच ‘वित्त’ शाखेचा राजमार्ग मोकळा होतो. चला तर मग, वैभवाच्या या ‘वाणिज्य’ शाखेला प्रवेश घेऊन ‘गगनभरारी’ मारू या!! 

Edited By - Prashant Patil

loading image