करिअर ‘ती’चे : सृजनशील, संशोधक वृत्तीची जोपासना 

Career
Career

विज्ञान शाखेतील करिअरच्या संधी अमर्याद आहेत. बारावी सायन्स पूर्ण केल्यावर विद्यार्थिनींना फक्त इंजिनिअरिंग व मेडिकल या दोनच वाटा दिसतात, परंतु प्रत्यक्षात या शाखेचा विस्तार खूपच मोठा आहे. बी. एस्सी. करून थांबू नये. कारण पोस्ट ग्रॅज्युएटनंतरच चांगली संधी मिळू शकते. इंजिनिअरिंगमध्ये खूप शाखा आहेत. मेकॅनिकल, केमिकल, ॲनालिटिकल यात खूप वाव आहे. तुम्हाला व्यवसाय करायचा असल्यास प्रथम अनुभवही आवश्यक आहे. आपली आवड व ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतल्यास करिअर निवडणे सोपे जाते. अभियांत्रिकीच्या सर्वच शाखा समान महत्त्वाच्या आहेत. पूल, रस्ते, इमारती, बंदरे, विमानतळाची निर्मिती, वीजनिर्मिती, सार्वजनिक क्षेत्र, इलेक्ट्रिकल, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरण निर्मिती यात करिअर करू शकता. 

  • बी. टेक इन मरिन इंजिनिअरिंग व मरिन टेक्नॉलॉजी, सागरी प्रवास, मालवाहतूक या क्षेत्रामध्ये करियर होऊ शकते. यासाठी धडाडी व साहस आवश्यक आहे. 
  • सैन्य प्रशिक्षणात खूप संधी आहेत. उदा. कमर्शियल पायलट.  
  • विज्ञान शाखेचे दुसरे अमर्याद केंद्र म्हणजे मेडिकल क्षेत्र. यासाठी १२ वीला PCBC (Physics, Chemistry, Biology) या विषयांची गरज असते. यानुसार एम. बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.डी.एस. व्हेटरनरी डॉक्टर, पॅरामेडिकल, फार्मसी, डी. फार्म., बी. फार्म. यातून स्वतःचे क्लिनिक काढू शकता किंवा उद्योजक म्हणून करिअर होऊ शकते. मेडिकलला अजून एक पर्यायी करिअर आहे. DMLT प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, एक्स-रे, सी. टी. स्कॅन या क्षेत्रात खूप कमी लोक जातात. कारण या करिअरला फिटनेस ठेवावा लागतो. त्याचप्रमाणे अद्ययावत ज्ञान अपेक्षित आहे. मेडिसीनचा अभ्यास करून फिजिओथेरपिस्ट, डायटेशियन, न्यूट्रीशन कन्सल्टंट हे हॉस्पिटलशी संलग्न असतात. सध्या फिटनेस इंडस्ट्री हा व्यवसाय तेजीत आहे. 
  • सरकारी नोकरी - B.Sc./ M.Sc., B.Ed. करून प्रोफेसर होता येते. SSB/ MPSC/ UPSC/ बँकेच्या परीक्षा/ सरकारी हॉस्पिटल/ CS/ IT या संदर्भात शासनाच्या अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. 

संशोधन क्षेत्र - विज्ञान शाखा ही कुतूहल निर्माण करणारी शाखा आहे. ज्यांना प्रश्न पडतात तेच भव्यदिव्य घडवतात. ‘असे का,’ असा प्रश्न ज्यांना निर्माण होतो ते संशोधन वाटेकडे वाटचाल करतात. संशोधनाला ‘करिअर’ बनविणे हा मूलभूत विज्ञानाचा गाभा आहे. अमेरिकेत संशोधनाला प्रचंड वावा आहे.

स्वतःचे पेटंट बनविणे, चौकटीबाहेर जाऊन प्रयोग करणे आवश्यक आहे. हवी आहे ती चिकित्सक वृत्ती. आपल्याकडे इस्रो, टाटा इन्स्टिट्यूट, आयसर, आघारकर संस्थांमध्ये हे काम चालते. IIT/ NIT/ IIM यातही प्रचंड रिसर्च केले जातात. 

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश मिळाल्यास करिअर उत्तमच होते. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना जास्त महत्त्व आहे. यासाठी National Entrance Screening Test द्यावी लागते. बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमेशन, कृषी जैवतंत्रज्ञान, ब्लेंडेड बायोसायन्स हा अभ्यासक्रमही संधी म्हणून पाहा. आपला भारत देश कृषिप्रधान आहे. शासनाच्या योजना, लागलेले नवीन शोध, नवीन अवजारे व तंत्रज्ञान यांचा वापर करून शेती करण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. आयटी व कॉम्प्युटर सायन्स यातून नोकरीची अनेक दालने खुली होतात. 
‘विज्ञानाच्या गवाक्षातून जाऊ या तिमिराकडे, तेजाकडे।। 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com