‘अ’ ऑनलाइनचा : वेळेचे नियोजन

आपले प्रयत्न वाया जाऊ नयेत म्हणून आपल्यापाशी किती वेळ उपलब्ध आहे आणि काय व किती काम करायचे आहे याचे गणित मांडून नियोजन करावे.
time management
time managementsakal
Summary

आपले प्रयत्न वाया जाऊ नयेत म्हणून आपल्यापाशी किती वेळ उपलब्ध आहे आणि काय व किती काम करायचे आहे याचे गणित मांडून नियोजन करावे.

वेळेचे महत्त्व विशद करणारे असे अनेक सुविचार आपल्याला माहीत आहेतच. ‘गेलेली वेळ परत येत नसते,’ ‘वेळ म्हणजे संपत्ती’, ‘वेळ कोणाची वाट पहात थांबत नाही’, ‘कोणतीही गोष्ट वेळेत केलेली बरी’, ‘वेळ आणि काळ सांगून येत नाही’ असे हे वेळेचे महत्त्व. ते जाणून आपण आपल्या अभ्यासाची दिशा ठरवली, तरच अपेक्षित उद्दिष्ट साध्य होऊ शकते. कोणत्याही कंपनी किंवा कार्यालयात प्रत्येक बाबीचे नियोजन केलेले असते त्याचप्रमाणे अभ्यास आणि परीक्षा या दोन्हीसाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते.

आपले प्रयत्न वाया जाऊ नयेत म्हणून आपल्यापाशी किती वेळ उपलब्ध आहे आणि काय व किती काम करायचे आहे याचे गणित मांडून नियोजन करावे. नियोजित वेळेप्रमाणे अभ्यास करत गेल्यास तो पूर्णत्वाला नेण्याचे समाधान मिळू शकते. शिवाय अभ्यास पूर्णत्वास गेला आहे, असा आत्मविश्वासही जागृत होतो. ठराविक वेळात अभ्यास करत गेल्यास परीक्षेच्या काळातही त्याचा फायदा होतो.

नियोजित वेळेनुसार अभ्यासाचे वेळापत्रक करून त्याचा उपयोग केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यात शाळेचा वेळ सोडल्यानंतर माझ्यापाशी किती व कोणता वेळ उपलब्ध आहे, मला स्वतःचा अभ्यास करण्यासाठी किती व कोणता वेळ उपलब्ध होऊ शकतो. कोणत्या विषयाचा अभ्यास अग्रक्रमाने हाती घेतला पाहिजे हे सर्व ठरवून हे वेळापत्रक करावे. केवळ आपल्यापाशी भरपूर वेळ आहे म्हणून आपण कसाही अभ्यास करत गेलो तर तो कधीच पूर्णत्वास जाऊ शकत नाही. काहीतरी राहून जाते. जे जमते आहे त्यालाच आपण जास्त महत्त्व देतो आणि अवघड, जास्त मेहनत लागणा‍ऱ्या बाबी दूर राहण्याची शक्यता असते. यासाठी उपलब्ध वेळेविषयीची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.

  • तारीख, वार, वेळ, विषय किंवा विविध विषयातील संकल्पना यांचा विचार केलेला असावा.

  • केवळ विषयाचे नाव लिहिण्यापेक्षा त्यातील कोणत्या घटकाला आणि उपघटकाला महत्त्व दिले जाणार आहे ते ठरवावे. त्यामुळे सर्वच विषय व घटकातील समतोल राखण्यास मदत होते.

  • परीक्षा सुरू होण्याचा दिवस आपल्या वेळापत्रकातील अभ्यासाचा अंतिम दिवस आहे असे गृहित धरून वेळेचे नियोजन करावे. तसेच दैनंदिन, आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षभराचे असे वेगवेगळे वेळापत्रकही बनवता येईल.

  • त्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा बाबी विचारात घ्यायला हव्यात.

  • हे विचारपूर्वक केलेले वेळेचे नियोजन लिहून काढणे गरजेचे असते. तसेच महत्वानुसार योग्य त्या रंगाचा वापर करून लिहिल्यास त्याचा परिणाम नक्कीच वेगळा होतो.

  • असे वेळापत्रक अभ्यासाच्या जागी लावून ठेवल्याने ते पाळणे शक्य होते आणि त्यानुसार आपला अभ्यास चालला आहे की नाही हे पण तपासता येत.

  • वेळापत्रकाचे सिंहावलोकन करणे गरजेचे असते. त्यामुळे वेळापत्रक केवळ शोभेचे बनून राहात नाही.

वेळेचे केलेले नियोजन परीक्षेतील यशासाठी हमखास उपयुक्त ठरते. परीक्षेसाठी तीन तास आहे असे चुकीचे उत्तर नेहमीच विद्यार्थ्यांकडून येते. परीक्षेदरम्यान आपल्याला उपलब्ध असतात ती एकशे ऐंशी मिनीटे. आपण मिनिटांचा विचार केल्यावरच प्रत्येक क्षणाचा विचार करायला शिकतो. म्हणूनच परीक्षेच्या काळात प्रत्येक मिनिटाचा हिशोब मांडायला हवा. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी किती वेळ लागतो हे लक्षात घेऊन नियोजन करावे. दर वेळेस घड्याळाकडे बघून आपले किती राहिले आहे हे तपासावे. लिहायचा आणि परत वाचून पाहण्यासाठीचा वेळ तपासावा. म्हणजे या तीन तासाच्या कालावधीत संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून होईल. वेळेचे असे विविध अंगांनी केलेले नियोजन वेळेतच करणे आवश्यक आहे. नाहीतर वेळ गेल्यावर काय उपयोग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com