करिअर अपडेट : टुरिस्ट गाइड अर्थात सांस्कृतिक राजदूत

टूरिस्ट गाइड व टूर एस्कॉर्ट हा टूर ऑपरेटर व पर्यटकांमधील दुवा आहे. ‘टूर एस्कॉर्ट’ हा देश विदेशातील सहलीसाठी त्यांचा पर्यटक सोबती म्हणून सहली यशस्वी व सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
Tourist Guide
Tourist GuideSakal
Summary

टूरिस्ट गाइड व टूर एस्कॉर्ट हा टूर ऑपरेटर व पर्यटकांमधील दुवा आहे. ‘टूर एस्कॉर्ट’ हा देश विदेशातील सहलीसाठी त्यांचा पर्यटक सोबती म्हणून सहली यशस्वी व सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करतो.

- डॉ. वंदना जोशी

पर्यटकांच्या सहलीमध्ये विविध स्मारके, किल्ले, संग्रहालये, राजवाडे यांचा समावेश असतो. एखादे स्मारक किंवा किल्ला त्याचे महत्त्व, त्याचा इतिहास, शैली व त्यातील बारकावे याची माहिती न घेतल्यास त्या पर्यटनस्थळाला दिलेली भेट पूर्ण झाली असे म्हणता येत नाही. या कारणासाठी आपल्याला पर्यटनस्थळी ‘टूरिस्ट गाइड’ची आवश्यकता भासते. ‘टुरिस्ट गाइड’ हा पर्यटन स्थळासाठी विशेष मार्गदर्शक म्हणून काम करतो.

टूरिस्ट गाईडला त्या देशाचा ‘सांस्कृतिक राजदूत’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्यावर देशाची प्रतिमा अवलंबून असते. देशात येणारा पर्यटक टुरिस्ट गाइड सोबत विविध पर्यटनस्थळांना भेटी देत असताना, टुरिस्ट गाइड पर्यटनस्थळाच्या माहिती व्यतिरिक्त अनेक गोष्टींची माहिती देतो शिवाय शंकांचे निरसनही करतो. देशातील, त्या-त्या राज्यातील मुख्य पिके, संस्कृती, कला, मुख्य उद्योग, हवामान, शिक्षण पद्धती इ. अनेक पैलूंची ओळख पर्यटकांना करून देत असतो.

टूरिस्ट गाइड व टूर एस्कॉर्ट हा टूर ऑपरेटर व पर्यटकांमधील दुवा आहे. ‘टूर एस्कॉर्ट’ हा देश विदेशातील सहलीसाठी त्यांचा पर्यटक सोबती म्हणून सहली यशस्वी व सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करतो. मुख्यत- ट्रॅव्हल एजन्सीमधील अनुभवी आणि आवड असलेले कर्मचारी टूर एस्कॉर्ट म्हणून सहली सोबत जातात. टूर एस्कॉर्टलाही सहलीदरम्यान विशिष्ट पर्यटन स्थळांसाठी टूरिस्ट गाईडची आवश्यकता असते. उदा. सिटी गाइड, म्युझियम गाइड, पार्क गाइड इ.

यासाठी डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम किंवा पर्यटनाशी निगडित इतर अभ्यासक्रमाबरोबर इतिहासाची माहिती असल्यास अधिक फायदेशीर ठरते. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने टुरिस्ट गाइडचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘इनक्रेडेबल इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेर सर्टिफिकेशन प्रोग्रॉम’ हा डिजिटल अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे आपल्या वेळेनुसार हा अभ्यासक्रम पूर्ण करून सर्टिफाईड टूरिस्ट गाइड बनू शकता. भारतामध्ये प्राचीन आणि इतर अनेक स्मारके आहेत. त्यातील अंदाजे ३ हजार ६९१ स्मारके हे भारतीय पुरातत्त्व विभागातील संरक्षित आहेत. सर्व स्मारकांची खऱ्या अर्थाने माहिती येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी टूरिस्ट गाइड या करिअरला खूप वाव आहे. टूरिस्ट गाइड हा टूर कंपनीशी समन्वय साधून किंवा फ्री-लान्सर म्हणूनही काम करू शकतो. टूरिस्ट गाइड या करिअरसाठी आपणास इतिहास, भूगोल, कला, समाजशास्त्र, वाहतूक आदींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये

  • प्रसन्न व्यक्तिमत्त्व

  • प्रभावी संवाद साधता येणे

  • बोलका स्वभाव

  • हजरजबाबीपणा

  • नेतृत्वगुण

  • जमावाला खिळवून ठेवण्याची कला

  • गुड कस्टमर स्किल्स

  • टाइम मॅनेजमेंट अँड इंटर पर्सनल स्किल्स

  • परकी भाषा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com