मानसवेध : एकाग्रता अभ्यासासाठी

बारावीच्या स्पर्धेत केवळ टक्केवारी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार १०० टक्के प्रयत्न, योग्य नियोजन, S३R पद्धत आणि स्वयंसूचनांद्वारे अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा मानसवेध
The S3R Pedagogical Engine: Re-engineering Survey Read Revise and Recite Slabs

The S3R Pedagogical Engine: Re-engineering Survey Read Revise and Recite Slabs

Sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ

"सर, दहावीला तिला ९२ टक्के होते. परंतु आता अभ्यासात एकाग्रता होत नाही. स्पर्धा लक्षात घेता यंदा बारावीला तेवढे टक्के तरी हवेत. काय करता येईल एकाग्रतेसाठी आणि मार्कांसाठी?’’, ‘‘सर, मुलगा हुशार आहे, परंतु पूर्वीसारखे, किमान ९० टक्के तरी पडतील असं काहीतरी करता येईल का?’’ हे आणि असे पालकांकडून वारंवार विचारले जातात. टक्के कितीही पडोत परंतु १०० टक्के प्रयत्न पाल्याच्या क्षमतेनुसार कसे करता येतील? असा प्रश्न फारसा कुणी विचारत नाही. खरंतर १०० टक्के प्रयत्न, योग्य दिशेने, योग्य पद्धतीने केल्यावर मार्क्स बहुधा चांगले मिळतातच. आणि या क्षमतेनुसार, १०० टक्के प्रयत्न करण्याच्या मेंदूच्या सवयीचाच खरंतर पुढे आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात उपयोग होत असतो. अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता कशी साधावी हा मोठा प्रश्न असतो. एकाग्रता साधता न आल्याने आत्मविश्वासावर परिणाम होतो. एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. अभ्यास करताना ज्ञानेंद्रियांद्वारे माहिती स्वीकारली जाणे, ती मेंदूत साठवली जाणे, आवश्यक तेव्हा आठवून चांगल्या पद्धतीने सादर करता येणे, या क्रिया व्यवस्थित होऊन त्यामध्ये योग्य समन्वय असणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com