- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आपल्या स्वप्नांना पंख देत नाहीत आणि उडण्याची मोकळीक देत नाही, तोवर भरारी घेणे अवघड आहे. चांगल्या शाळेसाठी मी लहानपणीच दूर गावी वसतिगृहात राहायला गेलो. तेव्हापासून मी शिक्षणासाठी विविध शहरांमध्ये, देशांमध्ये, काही ठिकाणी खूप सुविधा तर काही ठिकाणी खाण्यापिण्यालाही अवघड, असा अनुभव घेतला. परंतु या सगळ्यात जेवढे ज्ञान प्राप्त करता येईल, जेवढे अनुभव घेता येतील ते घ्यावे, हा एकच ध्यास होता. त्यामुळे बाकीच्या सगळ्या समस्या छोट्या वाटायच्या.