Drone Technology Revolutionizing Healthcare Logistics
sakal
- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
आजचा समाज नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल विश्वाशिवाय अकल्पनीय आहे. वैद्यकीय व्यवसायात यांचा वापर निःसंशयपणे वाढत आहे, त्यामुळे हे क्षेत्र सातत्याने प्रगती करणारे ठरले आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षम आणि जलद काळजी घेण्यास मदत करते की, ज्यामुळे कृतीसाठी लागणारा वेळ कमी होतो, ज्याचा अनेक प्रसंगी लोकांच्या जगण्यावर थेट परिणाम होऊ शकतो. अलीकडेच, आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मानवरहित विमान प्रणाली (UAS) किंवा ड्रोनचा वापर वाढला आहे.