परिणाम कोरोनाचा! नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी अर्ज | Educational | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जवाहर नवोदय विद्यालय
परिणाम कोरोनाचा! नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी अर्ज

नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी अर्ज

यावेळी कोरोना (Covid-19) संसर्गाचा परिणाम निवासी शाळांमधील (Residential Schools) प्रवेशावरही दिसून येत आहे. यावेळी निवासी शाळांमधील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. यावेळी नवोदय विद्यालयासाठी (Navodaya Vidyalaya) 15 टक्‍क्‍यांहून कमी अर्ज आले असून सैनिक स्कूलमध्ये 18 ते 20 टक्के कमी अर्ज आले आहेत. नवोदय विद्यालय संघटनेनेही प्रवेशासाठी दोनदा तारीख वाढवली, त्यानंतरही अर्जांची संख्या वाढलेली नाही. यावेळी सिमुलतला निवासी शाळेतील (Simultala Residential School) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जांची संख्याही घटली आहे. (Due to Corona less than 15 percent applications for admission in Navodaya Vidyalayas)

हेही वाचा: युनियन बॅंकेत एसओ, डोमेन एक्‍सपर्ट अन्‌ इतर पदांची भरती

रामकृष्ण मिशनमध्येही (Ramakrishna Mission) अर्जांची संख्या 8 ते 10 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. कोरोना संसर्गामुळे दीड वर्षाहून अधिक काळ निवासी शाळा बंद होत्या. त्यानंतर ऑनलाइन वर्ग सुरू झाले. निवासी शाळा सुरू करण्याचा आदेश सप्टेंबर 2021 मध्ये देण्यात आला होता. ऑक्‍टोबर 2021 पासून शाळा सुरू झाल्या. निवासी शाळेचे 2021-22 चे नावनोंदणी सत्रही उशिराने सुरू झाले.

नवोदय विद्यालयांबद्दल बोलायचे झाल्यास, बिहारमधील (Bihar) सुमारे 10 जिल्ह्यांतील नवोदय विद्यालयांमध्ये ऑनलाइन अर्जांची संख्या कमी झाली आहे. अररिया जिल्ह्यात 2021 मध्ये 3942 अर्ज आले होते, यावेळी 2230 अर्ज आले आहेत. याशिवाय औरंगाबाद (Aurangabad), भोजपूर, कैमूर, रोहतास आदी जिल्ह्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑनलाइन अर्ज कमी आले आहेत. मात्र, पाटणा जिल्ह्यासाठी अर्ज वाढले आहेत. पाटणा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात 2021 मध्ये 3552 अर्ज आले होते. यावेळी 3926 अर्ज दाखल झाले आहेत.

हेही वाचा: लसीचे प्रमाणपत्र नाही तर वेतन नाही! पंजाब सरकारचे आदेश

प्रवेश कमी होण्याची ही आहेत कारणे

  • कोरोनामुळे मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत शाळा बंद

  • कोरोनामुळे पालकांमध्ये आपल्या मुलाना निवासी ठिकाणी पाठवण्याची भीती

  • 2021 प्रमाणे 2022 च्या नामांकनात विलंब होण्याची भीती

  • मुलांमध्ये एकत्र राहिल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती

Web Title: Due To Corona Less Than 15 Percent Applications For Admission In Navodaya Vidyalayas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top