Pune News : कमवा व शिका योजनेच्या मानधनवाढीच्या प्रस्तावावर सहा महिन्यानंतरही अंमलबजावणी नाही; अधिसभा सदस्यांचा रोष

संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति तास मानधन ६० रुपये करण्यास अधिसभेने मंजुरी दिली
earn and learn scheme per hour 60 rs not implemented colleges affiliated sppu education
earn and learn scheme per hour 60 rs not implemented colleges affiliated sppu educationesakal

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत मार्च २०२३ मध्ये कमवा व शिका योजनेच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रति तास मानधन ६० रुपये करण्यास अधिसभेने मंजुरी दिली. मात्र, सहा महिने होऊन गेले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याने अधिसभा सदस्यांनी रोष व्यक्त केला आहे.

विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी तातडी या संदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळाची अवस्था असून, ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना जीवनदायी ठरत आहे. शिनलकर म्हणाले, ‘‘पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी कमवा व शिका योजनेचा लाभ घेतात.

earn and learn scheme per hour 60 rs not implemented colleges affiliated sppu education
Pune News : समाजातील देवदूतांचा आज होणार गौरव

यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्याची गरज अधिक आहे. परंतु,महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिन्यांहून अधिक कालावधी उलटला तरीही अद्याप विद्यापीठाने महाविद्यालयात कमवा व शिका योजना राबवण्यास मंजुरीच दिली नाही. या पूर्वीच्या दोन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकांमध्ये केवळ प्र-कुलगुरू नियुक्ती व इतर प्रशासकीय बाबींवरच चर्चा होत राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांची निगडित असणाऱ्या प्रश्नांबाबत निर्णय होऊ शकले नाहीत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com