शैक्षणिक संधी

Education
Education

शैक्षणिक संधी - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर- व्यवस्थापन सल्लागार
१. महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यपालन विद्यापीठ, नागपूरअंतर्गत संशोधनपर पीएचडीसाठी प्रवेश परीक्षा. 
    अर्जाचा नमुना व तपशील : महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यपालन विद्यापीठाचे संकेतस्थळ www.mafsu.ac.in 
    अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज कुलसचिव, महाराष्ट्र पशुवैद्यक व मत्स्यपालन विद्यापीठ, फुटाळा तलाव मार्ग, नागपूर-४४०००१ या पत्त्यावर ५ डिसेंबर २०१९ पर्यंत पोचतील अशा बेताने पाठवावेत. 
२. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे येथील पीएचडी अभ्यासक्रम : 
    अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संपर्क : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे संकेतस्थळ www.niv.co.in अथवा www.icmr.nic.in 
    संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्‍टर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, २० ए, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे-४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१९. 
३. बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पिलानी येथील संशोधनपर पीएचडी. 
    उपलब्ध विषय ः विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व व्यवस्थापन. 
    विशेष सूचना :  योजनेअंतर्गत निवड झालेल्या संशोधक-विद्यार्थ्यांना दरमहा शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध. 
    अधिक माहिती व तपशील : वरील संदर्भात तपशिलासाठी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानीच्या httpः//www.bitsadmission.com/phd/index.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी. 
    संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 
९ डिसेंबर २०१९  आहे. 
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व ओला स्किलिंग, बंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे वाहन चालकांसाठी निःशुल्क निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण :  

    अधिक माहिती व तपशील :  योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी बार्टीच्या www.barti.in>notic board>application form far ola priver training या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे - ४११००१ या पत्त्यावर १० डिसेंबर २०१९ पर्यंत पोहोचतील, अशा बेताने पाठवावेत. 
५. डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, पुणे येथील संशोधनपर पीएचडी :  
    अधिक माहिती व तपशील :  वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डिफेंस इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, पुणेच्या www.diat.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

    विशेष सूचना : निवडक उमेदवारांना विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. 
    अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्‍यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज जॉइंट रजिस्ट्रार, डिफेंन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्‍नॉलॉजी, गिरीनगर, पुणे - ४११०२५ या पत्त्यावर १० डिसेंबर २०१९ पर्यंत पाठवावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com