
नागपूर : कोरोनामुळे तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे जग जवळ आले. यामागे ‘आयटी’ क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सबकुछ ऑनलाइन या संकल्पनेतून या क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. येत्या काळात या क्षेत्रात करिअरला मोठी संधी आहे. यात प्रामुख्याने आयटीमध्ये एमबीए प्रोफेशनल तयार करण्यासाठी ‘एमबीए इन आयटी’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
हा अभ्यासक्रम इम्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशनशी निगडित आहे. ज्यात प्लानिंग, सिलेक्शन, इम्प्लिमेंटेशन आणि ॲडमिनिस्ट्रेशनची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करावी लागते. कोणत्याही उद्योगात आयटी विषयात एमबीए केलेला विद्यार्थी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेष म्हणजे, सॉफ्टवेअर सोल्युशन्सचे डिझायनिंग आणि इम्प्लिमेंटेशन यात त्याची भूमिका महत्त्वाची असते. कोणत्याही शाखेचा पदवीधर एमबीए करू शकत असल्याने त्याला या अभ्यासक्रमाचा त्याच्या करिअरमध्ये मोठा फायदा मिळतो. या अभ्यासक्रमाने बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी आहे. त्यामुळेच आयटीमध्ये ‘एमबीए किंवा एमबीए आयटी’हा अभ्यासक्रम लोकप्रिय आहे. त्यामुळे ती संधी मिळविण्यासाठी कौशल्याची साथ मिळणे आवश्यक आहे.
आवश्यक कौशल्ये
संभाषण कौशल्य
व्यवसाय प्रक्रियेची सर्व कार्ये समजून घेणे
संख्यात्मक विश्लेषण, उपायांच्या संदर्भात गणितीय क्षमता
तार्किक विश्लेषण
तंत्रज्ञानाला व्यवसायाशी जोडण्याची क्षमता
या कंपन्यांमध्ये नोकरी
एचसीएल, टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्रा, माइंडट्री
या आहेत कौशल्य अभ्यासक्रम संस्था
इंडियन इन्स्टीट्युट ऑफ फॉरेन ट्रेड दिल्ली
आयआयएम, इंदौर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
अमीटी बिझनेस स्कुल, मुंबई
डीआयईएमएस, औरंगाबाद
चिंतामणराव इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सांगली
धन्वंतरी इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, नाशिक
डी.वाय. पाटील स्कुल ऑफ मॅनेजमेंट पुणे
आयएम, जालना
एमआयटी, पुणे
एमआयटी स्कुल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन कोल्हापूर
या क्षेत्रात संधी
व्यावसायिक कार्याचे ज्ञान
कार्यात्मक डोमेनमधील व्यवसाय समस्यांचे गणितीय मॉडेलिंग
व्यवसाय गणित आणि आकडेवारी
संभाषण कौशल्य
व्यवसाय प्रक्रिया समजून घेण्याची आणि मॅप करण्याची क्षमता
सॉफ्टवेअर अभियांत्रिकी आणि प्रक्रिया
आयएसओ-९०००, सीएमएम सारखी गुणवत्ता प्रणाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.