१५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेस तांत्रिक अडचणींनी सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news CET examination 15 professional courses technical difficulties

१५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’ परीक्षेस तांत्रिक अडचणींनी सुरवात

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विधी (पाच वर्ष एकात्मिक), एम.आर्च, बी.पी.एड, एम.एड अशा १५ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांना वेळापत्रकानुसार सुरवात झाली. दरम्यान सकाळ आणि दुपारच्या सत्रात तांत्रिक व सर्व्हर नेटवर्किंगच्या बिघाडामुळे काही विद्यार्थ्यांची परीक्षा खंडित व विलंबित झाली होती. त्यामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा घेण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने स्पष्ट केले आहे.

सकाळच्या सत्रात बी.एड-एम.एड, बीपीएड, विधी (पाच वर्ष एकात्मिक) या परीक्षा झाल्या. तर दुपारच्या सत्रात एम. आर्च, एम.एचएमसीटी, एम.एड आणि विधी (पाच वर्ष एकात्मिक) परीक्षा झाल्या. परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे काही केंद्रावरील परीक्षा विलंबाने पूर्ण झाली. तर काही केंद्रातील विद्यार्थ्यांना सर्व्हर नेटवर्किंग बिघाडामुळे लॉगिन करता आले नाही. तांत्रिक कारणामुळे किंवा सर्व्हर नेटवर्किंग बिघाडामुळे परीक्षा सुरू होऊ शकली नाही किंवा पूर्ण होऊ शकली नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांचे सर्व्हरवरील लॉगची पडताळणी करून त्यांची फेर परीक्षा पुर्ननियोजित करण्यात येईल. त्यासंबंधी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना ई-मेल आणि एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

सीईटी परीक्षेचा तपशील

अभ्यासक्रम : एकूण केंद्र संख्या : नियोजित विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी

बी.एड-एम.एड (तीन वर्षीय एकात्मिक) : २४ : २,११२ : ९६१

बी.पी.एड : ५१ : ६,९०१ : ५,१२९

विधी (पाच वर्ष एकात्मिक) सकाळचे सत्र : १२७ : १४,६६२ : ९,६२८

विधी (पाच वर्ष एकात्मिक) दुपारचे सत्र : १२७ : १४,२८६ : ९,७२१

एम. आर्च : १५ : ८३७ : ५८३

एम.एचएमसीटी : ०६ : ३९ : १६

एम.एड : ७१ : ३,२६० : २,४५६

Web Title: Education News Cet Examination 15 Professional Courses Technical Difficulties

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..