पुणे विद्यापीठात सायंटिफिक कॉम्प्युटिंग आणि सिम्युलेशनचे अभ्यासक्रम - प्रा. डॉ. भालचंद्र पुजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news Courses Scientific Computing and Simulation at Pune University Bhalchandra Pujari pune

पुणे विद्यापीठात सायंटिफिक कॉम्प्युटिंग आणि सिम्युलेशनचे अभ्यासक्रम - प्रा. डॉ. भालचंद्र पुजारी

पुणे : माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायंटिफिक कॉम्प्युटिंग आणि मॉडेलिंग व सिम्युलेशन हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. आंतरविद्याशाखीय प्रकारातील हे अभ्यासक्रम अनुक्रमे एम.एससी. आणि एम.टेक.ची पदवी प्रदान करतील. हे दोन्ही अभ्यासक्रम आता सायंटिफिक कॉम्प्युटिंग, मॉडेलिंग आणि सिम्युलेशन विभागात एकाच छताखाली उपलब्ध आहेत, अशी माहिती प्रा. डॉ. भालचंद्र पुजारी यांनी दिली.

डॉ. पुजारी म्हणाले, ‘‘उपयोजित गणित, संख्याशास्त्र, संगणन या तिन्हींचा संगम या अभ्यासक्रमात आहे. आधुनिक काळाची गरज ओळखून डेटा सायन्स, मशिन लर्निंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, कॉम्प्लेक्स नेटवर्क्स किंवा नेटवर्क सायन्स, पॅरलल कॉम्प्युटिंग, ऑपरेशन्स रिसर्च या आणि इतर अनेक महत्त्वाच्या विषयांचे पर्याय उपलब्ध आहेत.’’ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

Web Title: Education News Courses Scientific Computing And Simulation At Pune University Bhalchandra Pujari Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top