रिअल इस्टेटच्या क्षेत्रात करिअरसाठी Diploma, BBA अभ्यासक्रमाची सुरवात...

क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती क्रेडाई पुणे-मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Real estate
Real estateesakal

पुणे : रिअल इस्टेटच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी डिप्लोमा आणि बीबीएच्या अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात येत आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिकांची आघाडीची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी-एडीटी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती क्रेडाई पुणे-मेट्रोचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या (मिटकॉम) अधिष्ठाता डॉ. सुनीता कराड, कुशल क्रेडाईचे अध्यक्ष जयप्रकाश श्रॉफ, एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या अधिष्ठाता रजनीश कौर बेदी आणि हेड ऑफ डिपार्टमेंट प्रोजेक्ट अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटच्या आशा ओक हे उपस्थित होते.

क्रेडाई पुणे मेट्रो आणि एमआयटी-एडीटी यांच्या वतीने ‘डिप्लोमा इन रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट’ हा पदव्यूत्तर पदविका आणि ‘बॅचलर्स इन बिझनेस अडमिनिस्ट्रेशन’ (रिअल इस्टेट अँड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट) असे दोन नवीन अभ्यासक्रम जुलै २०२२ पासून सुरू करण्यात येता आहेत. रिअल इस्टेटच्या क्षेत्रात नोकरीच्‍या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आवश्‍यक त्या कौशल्य प्रशिक्षण व शिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी केवळ अभियांत्रिकीचेच नव्हे तर इतर शाखेतून पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येणार आहे. एक वर्षाचा पदव्यूत्तर पदविका आणि तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रमामाध्ये बांधकाम व्यवसायासी संबंधित प्राथमिक शिक्षण दिले जाईल. त्यात बांधकाम साहित्याची खरेदी, साईट व्यवस्थापन, कायदेशीर बाबींचे ज्ञान आदी विषयांचा समावेश आहे. असे यावेळी डॉ. कराड म्हणाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com