TET Case : टीईटी गैरप्रकरात अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे पगार थांबविले

ऑगस्टपासून वेतन न देण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश; प्राथमिकचे ५७६, तर माध्यमिकचे ४४७ शिक्षकांचा समावेश
education news Salary of teachers disqualified TET malpractice pune
education news Salary of teachers disqualified TET malpractice puneesakal
Updated on

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या जवळपास ५७६ प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचे, तर ४४७ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून त्यांना ऑगस्टपासूनचे वेतन न देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. या अपात्र शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठविण्याची सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. टीईटी परीक्षा २०१९मध्ये सात हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरविले आहे. या अपात्र उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाला उमेदवारांची यादी देण्यात आली आहे.

या यादीतील काही उमेदवार हे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. तसेच ते शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. त्यामुळे या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे वेतन तातडीने थांबविण्यासाठी त्यांचे शालार्थ आयडी गोठविण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. संबंधितांचे नाव ऑगस्टच्या वेतन देयकातून वगळून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार करावे, तसेच या शिक्षकांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने वेतन अनुदान दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

या गैरप्रकारातील समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे आधार कार्ड आणि शालार्थ आयडीनुसार मॅपिंग केले असताना अपात्र उमेदवारांपैकी ५७६ उमेदवार हे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक म्हणून कार्यरत असून वेतन अनुदान घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवण्याचे आदेश दिल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी सांगितले.

तर, महाआयटीकडून देण्यात आलेल्या अपात्र उमेदवारांपैकी ४५६ पैकी ९ नावे दोन वेळा आलेली आहेत. दोन वेळा आलेली नऊ नावे वगळून उर्वरित ४४७ उमेदवार राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले असून ते शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे या उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com