Education News : जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा पाच डिसेंबरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education news Workshop on Germany Dual Degree on 5th December

Education News : जर्मनी ड्युअल पदवीबाबत कार्यशाळा पाच डिसेंबरला

पुणे : जर्मनी ड्युअल पदवी कार्यक्रमाबाबत प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे पाच डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. जर्मनी देशाबरोबर भागीदारी करुन सुरू केलेला ड्युअल पदवी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम करण्यास उपयुक्त आहे. यामुळे हा अभ्यासक्रमाविषयी जागरुकता करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत २०२२ या शैक्षणिक वर्षामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अन्न उत्पादन, फूड ॲण्ड बिवरेज सेवा, फिटर, मशिनिस्ट, टर्नर, इलेक्ट्रिशिअन, इलेक्ट्रॉनिक्स, बिल्डिंग कंस्ट्रक्शन, प्लंबर, सुतार, वेल्डर अभ्यासक्रमात उत्तीर्ण प्रशिक्षणार्थी, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम विद्यार्थी, आजी-माजी प्रशिक्षणार्थी, अप्रेंटिसशिप उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी लियोस सॅगिटॅरियस कन्सल्टिंगच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक कवी लुथरा (९९२००४००४२) आणि पी. एस. वाघ (९२२४३२४८९३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.