esakal | फिजिक्समधून पदवी घेतलीये? मग 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी
sakal

बोलून बातमी शोधा

jobs

फिजिक्समधून पदवी घेतलीये? 'या' क्षेत्रात आहेत करिअरच्या संधी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या काही काळात विज्ञान शाखेतून पदवी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अनेकांना सायन्सचा अभ्यास करताना भौतिकशास्त्राची (फिजिक्स) प्रचंड भीती वाटते. खरं पाहायला गेलं तर फिजिक्स हा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा (इंजिनिअरिंग) पाया असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच विज्ञान शाखेत फिजिक्सला प्रचंड महत्त्व आहे. विशेष म्हणजे अनेक जण फिजिक्स घेऊन पदवी पूर्ण करतात. परंतु, फिजिक्स घेतल्यानंतर नेमक्या कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत याची पुरेशी माहिती अनेकांना नसते. परिणामी, पदवी असतानादेखील अनेक जण हे क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रांमध्ये नोकऱ्या शोधतात. म्हणूनच, फिजिक्समधून पदवी घेतल्यानंतर कोणत्या क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत ते पाहुयात. (education-physics-degree-career-options-salary-and-jobs)

१. रिसर्च सायंटिस्ट -

फिजिक्समधून गॅज्युएट झाल्यानंतर इंटर्न किंवा टेक्निशिअन म्हणून रिसर्च सायंटिस्ट (Research Scientist) क्षेत्रात करिअर करु शकता. परंतु, जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी नोकरी हवी असेल तर याच क्षेत्रात अधिक शिक्षण फायद्याचं ठरेल. फिजिक्स इंस्टिट्युटच्या माध्यमातून एमएससी, एमफिस आणि पीएचडी या पदव्या मिळवता येतात. केवळ इतकंच नाही तर अंतराळाविषयी कुतूहल किंवा आवड असणारे विद्यार्थीदेखील या क्षेत्रात करिअर करु शकतात. फिजिक्स घेतल्यानंतर एस्ट्रो फिजिक्स, पार्टिकल फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, अँटमोस्फेयरिक, एअरोस्पेस डायनामिक, अँटोमिक अँड लेजर फिजिक्स ओसियन आणि प्लानेटरी फिजिक्स या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी आहेत.

हेही वाचा: ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

२. स्पेस आणि स्ट्रोनॉमी सायन्स -

अंतराळवीर व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, या क्षेत्राकडे नेमकी कशी वाटचाल करावी याचं पुरेसं ज्ञान अवगत नसतं. म्हणूनच, जर तुम्हाला अंतराळवीर व्हायचं असेल तर फिजिक्सवर लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. अँडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ट्रेनी रोल या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे फिजिक्स विषयातील पदवी पुरेशी आहे. परंतु, तुम्हाला अंतराळवीर व्हायचं असेल तर याच विषयात मास्टर डिग्री पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे.

३. हेल्थकेअर -

हेल्थकेअर क्षेत्रात फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फिजिक्स सायंटिस्ट हे मेडिकल टेक्नॉलॉजी आणि डिव्हाइस तयार करणे, त्याचं परिक्षण करणे आणि त्यांची गुणवत्ता वाढविणे या कामांमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर्सला मदत करत असतात. त्यामुळे तुमच्याकडे फिजिक्सची पदवी असेल तर या क्षेत्रात तुम्हाला करिअरची संधी आहे. विशेष म्हणजे नव्या टेक्नॉलॉजिची चाचणी करणे, त्यांना मान्यता देण्यासाठी रेडिओलॉजी, रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि न्युक्लिअर मेडिसीन सारख्या सेक्टरमध्ये काम करता येऊ शकतं.

हेही वाचा: ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

४. इंजिनिअरिंग -

फिजिक्स विषयात पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. खासकरुन मॅन्युफॅक्चरिंग, टेक्नॉलॉडी बेस्ड क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी आहेत. यात वैद्यकीय क्षेत्र, ऊर्जा विभाग, ट्रान्सपोर्ट, डिफेन्स, स्पेस एक्सप्लोरेसन आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात.

loading image