Pune University : विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवड जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

education Selection of members Management Council of Savitribai Phule Pune University announced

Pune University : विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवड जाहीर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अधिसभेत प्राचार्य, अध्यापक, विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि नोंदणीकृत पदवीधर गटातील सदस्यांतून ही निवड करण्यात आली.

प्राचार्य गटातून खुल्या प्रवर्गामध्ये पुण्यातील हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे डॉ. नितीन घोरपडे, अनुसूचित जाती प्रवर्गातून बारामतीच्या मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे डॉ. देविदास वायदंडे यांची अधिसभेत निवड करण्यात आली.

तर अध्यापक गटातून पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाचे डॉ. धोंडीराम पवार, नगरच्या शेवगाव तालुक्यातील आबासाहेब काकडे कला महाविद्यालयातील प्रा. संदिप पालवे यांनी, तर व्यवस्थापन प्रतिनिधिंतून डॉ. राजेंद्र विखेपाटील यांची निवड करण्यात आली आहे.

तर पदविधरांमधून बागेश्री मंठाळकर आणि नाशिकचे सागर वैद्य यांची व्यवस्थापन परिषदेवर निवड झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधीचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.