esakal | मागील सहा वर्षात देशभरातील अभियांत्रिकीची ५५७ महाविद्यालय बंद | College
sakal

बोलून बातमी शोधा

 colleges closed

मागील सहा वर्षात देशभरातील अभियांत्रिकीची ५५७ महाविद्यालय बंद

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : देशात मागील सहा वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण (Engineering education) देणारी तब्बल ५५० अभियांत्रिकीची महाविद्यालये (college) बंद झाली आहेत. यामध्ये राज्यातील १२९ महाविद्यालयाचा समावेश आहे. यासाठीची माहिती ही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या महाविद्यालयाच्या यादीनंतर समोर आली आहे.

हेही वाचा: नारायण ईंगळे आरक्षणाचा पहिला अधिकारी; यशोमती ठाकूर यांनी केले कौतुक

परिषदेने नुकतेच देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयाची यादी जाहीर केली आहे. यात २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात ६४७४ महाविद्यालयांची नोंद होती. ती संख्या २०२१-२२मध्ये ५९१७ इतकी झाली असल्याची आकडेवारी जाहीर केली आहे.यानौले देशभरात तब्बल म्हणजे ५५७ महाविद्यालये ही बंद झाली आहेत. यामध्ये राज्यात २०१६-१७मध्ये ७९५ अभियांत्रिकीची महाविद्यालये होती. २०२१-२२मध्ये ६६६ इतकी महाविद्यालये शिल्लक राहिले आहेत.

रिक्त जागांमुळे वाढल्या अडचणी

देशभरात २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरात मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकीच्या संस्था सुरू झाल्या होत्या परिणामी देशातील महाविद्यालयात रिक्त जागांची संख्या १० लाखांच्या वर पोहचली होती. यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ही महाविद्यालये बंद होण्याचे प्रस्ताव परिषदेकडे सादर होण्यास सुरुवात झाली. परिषदेची मान्यता मिळाल्यानंतर महाविद्यालये बंद झाली. यामुळे उपलब्ध जागांची संख्याही कमालीची कमी झाली.

अशा प्रकारे जागा घटल्या

२०१६-१७मध्ये अभियांत्रिकीसाठी २९.९९ लाख जागा उपलब्ध होत्या. ती संख्या २०२१-२२मध्ये २३.६१ लाख इतकी झाली आहे. म्हणजे सुमारे सहा लाखांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत. नवीन महाविद्यालयच्या तुलनेत जुन्याना मिळणारी पसंती आणि नवीनमध्ये रिक्त राहणाऱ्या जागांचे वाढते प्रमाण लक्षात घेता देशात आणि राज्यातही अनेक महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.

loading image
go to top