आयटीआय प्रवेशाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ | ITI Admission Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ITI Admission

ITI प्रवेशाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनायाच्या (ITI) अंतर्गत येणऱ्या राज्यातील शाासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध ट्रेडच्या प्रवेशासाठी (ITI Admissions) पुन्हा एकदा मुदतवाढ (Date extension) देण्यात आली आहे. यामुळे आता हे प्रवेश ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी (Digambar Dalvi) यांनी दिली.

हेही वाचा: नवी मुंबई : १५ नोव्हेंबरला कोविड योद्ध्यांच्या घरांची सोडत

ही मुदतवाढ देण्यासाठी प्रशिक्षण महासंचालनालय, नवी दिल्ली यांनी तिसऱ्या पाळीतील तुकड्यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील आयटीआयच्या प्रवेशाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ज्या उमेदवारांना प्रवेश मिळाला नाही, अथवा आयटीआयच्या प्रवेशासाठी इच्छुक आहेत, त्यांना या नवीन मुदतीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. अर्जात दुरूस्ती करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी 11 ते 15 नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आली असून गुणवत्ता यादी 16 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांनी 17 नोव्हेंबर पासून वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संस्थास्तरावर होणाऱ्या समुपदेशन फेरीतून प्रवेश केले जाणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

loading image
go to top