TET परीक्षा उद्या नियोजित वेळेतच; परिषद परीक्षा घेण्यावर ठाम | Education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam

TET परीक्षा उद्या नियोजित वेळेतच; परिषद परीक्षा घेण्यावर ठाम

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (Maharashtra exam council) रविवारी २१ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्यात येत असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी दिली. रविवारी टीईटीसोबतच देशभरात राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) या ही परीक्षाही होत असल्याने त्यामुळे अनेक उमेदवारांची अडचण होईल, शिवाय राज्यात एसटीचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फटका बसेल, यामुळे टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती.

हेही वाचा: ...म्हणून माजी आमदार सुनिल शिंदे, राजहंस सिंह यांची निवड

मात्र टीईटीला बसलेल्या उमेदवारांनी आपल्याकडे कोणत्याही प्रकारची तशी तक्रार नोंदवलेली नाही. शिवाय जी नेटची परीक्षा आहे, त्याचा आणि टीईटीच्या परीक्षेचा फारसा संबंध येणार नसल्याने आमच्याकडून घेण्यात येणारी टीईटीची परीक्षा ही नियोजित वेळेतच घेतली जाणार असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले. राज्यात ही टीईटीची परीक्षा एकुण तब्बल १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे .

मागील वर्षांच्या तुलनेत यात या परीक्षा केंद्रात दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यात मुंबईत ३४ परीक्षा केंद्रांवर १० हजार ६४६ उमेवार परीक्षा देणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात टीईटीच्या दोन्ही पेपरसाठीची परीक्षा ही एकुण ३९ परीक्षा केंद्रावर होणार असून या परीक्षेला ११ हजार ८२८ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. तर पालघर जिल्ह्यात १५ परीक्षा केंद्रावर ५ हजार २०० आणि रायगड जिल्ह्यात सर्वात कमी अशा केवळ ५ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ५४२ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

अशी होणार आहे परीक्षा

टीईटला पेपर- १ साठी तब्बल १ लाख १६ हजार ३८१ तर पेपर-२साठी ७६ हजार २०३ उमेवार बसणार आहेत. तर दोन्ही पेपरसाठी मिळून १ लाख ३८ हजार ४७ उमेवार असतील. परीक्षा पेपर-१ची परीक्षा ही सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत होणार असून पेपर-२ ची परीक्षा ही दुपारी २ ते ४.३० या कालावधीत पार पडणार आहे.

loading image
go to top