...म्हणून माजी आमदार सुनिल शिंदे, राजहंस सिंह यांची निवड | Legislative assembly election update-nss91 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sunil shinde  and rajhans singh

...म्हणून माजी आमदार सुनिल शिंदे, राजहंस सिंह यांची निवड

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतून (bmc) विधानपरीषदेवर (Legislative assembly) निवडून जाणाऱ्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून (shivsena) माजी आमदार सुनिल शिंदे (sunil shinde) आणि भाजपकडून माजी आमदार राजहंस सिंह (rajhans singh) यांना उमेदवारी दिली आहे.10 डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीत (election) संख्याबळानुसार शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित आहे.

हेही वाचा: मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरात ड्रोनवर बंदी

शिंदे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातून मोठी स्पर्धा होती तर राज्य भाजपच्या नेत्यांच्या मनात पूर्वी राजहंस सिंह यांचे नाव होते मात्र, माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंहही या पदासाठी इच्छूक होते. शिंदे यांची वर्णी लागण्यामागे त्यांचा सय्यमी स्वभाग कारणी आहे. तर,राजहंस सिंह यांनीही पक्षाकडून कोणतीही अपेक्षा न बाळगता लॉबींग न करता सय्यमी राहील्याने त्यांना संधी मिळाली.असे असले तरी यामागे आगामी महानगरपालिकेची निवडणुकीची गणितंही आहेत.

शिंदे यांना संधी

शिंदे हे 2007 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.ते सलग दोन वेळा नगरसेवक होते.या काळात त्यांनी बेस्ट समिती सारख्या महत्वाच्या समितीचे अध्यक्ष पद भुषवले होते.या काळात त्यांना पालिकेतील काही समित्यांच्या अध्यक्ष पदाची संधी मिळू शकली नव्हती. मात्र,त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही.वरळी सारख्या भागात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नेहमीच चुरस असते. एकापेक्षा एक तुल्यबळ स्थानिक पदाधिकारी असतानाही त्यांना 2014 च्या विधानसभेत उमेदवारी मिळाली.त्यातही ते विजयी झाले.मात्र,2019 मध्ये या मतदार संघातून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली.

त्यामुळे शिंदे यांच्या नावापुढे माजी आमदार पद लागले. मात्र,तेव्हाही त्यांनी कोणती नाराजी व्यक्त केली नाही अथवा कोणतेही पद मिळावे म्हणून लॉबींग केले नाही. शिंदे हे शिवसेनेच्या कामगार संघटनेतून पुढे आलेले असले तरी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या कडून जेव्हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सुत्र येऊ लागली तेव्हा शिंदे यांनी नगरसेवक होण्याचा मान मिळाला. एकूणच शिंदे हे प्रामुख्याने उध्दव ठाकरे यांच्या काळात तयार झालेले लोकप्रतिनिधी आहेत.आता शिवसेनेची सुत्र आदित्य ठाकरे यांनी सांभाळण्यास सुरवात केली आहे.त्यामुळे या उमेदवारीसाठी माजी आमदार सचिन अहीर तसेच युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांची चर्चा होती.

मात्र,अशा वेळी उध्दव ठाकरे यांच्या पठडीत तयार झालेल्यांना अचानक बाजूला सारल्यास त्याचा पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर परीणाम होऊ शकतो.आता आदित्य ठाकरे यांचा जमाना आला अशी मानसिकता या पदाधिकाऱ्यांमध्ये तयार झाल्यास त्याचा आगामी पालिकेवर परीणाम होऊ शकतो.त्यामुळे सुनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: कल्याण : रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने हत्या; गुन्हा दाखल

राजहंस सिंह वरचढ

राजहंस सिंह हे 1992 ते 1997 या काळात नगरसेव होते.त्यानंतर ते 2000 पासून 2012 पर्यंत सलग 12 वर्ष नगरसेवक होत त्यातील 6 वर्ष ते पालिकेचे विरोधी पक्षनेते होते.2009 मध्ये ते दिंडोशी विधानसभेतून कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडुन आले.2014 च्या पराभवानंतर 2017 त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.मात्र,त्यांनी भाजप कडे कधीही स्वत:च्या उमेदवारीसाठी लॉबींग केले नाही.त्यामुळे राज्य भाजपने पहिल्या पासूनच या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाचा विचार केला होता.मात्र,राजहंस स्वत: विधानपरीषदेसाठी फारसे इच्छूक नव्हते.मात्र,आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपला मुंबईत उत्तर भारतीय चेहरा हवा आहे.

त्यात,राजहंस सिंह हे सध्याच्या दृष्टीने योग्य उमेदवार मानले जातात.कॉंग्रेस मधून भाजप मध्ये आलेले माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह हे ही उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक होते.मात्र,त्यांना उमेदवारी मिळावी ही भाजपच्या राज्यातील नेत्यांची इच्छा नव्हती.मुळात त्यांना भाजप मध्ये प्रवेश मिळावा म्हणून राज्यातील नेत्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत उलट त्यांनी पक्षात येऊ नये अशीच अपेक्षा होता.मात्र,राजहंस सिंह यांनी उत्तर प्रदेश दिल्ली असे कनेक्‍शन वापरुन भाजप मध्ये प्रवेश मिळवला होता.ती नाराजीही स्थानिक नेत्यांमध्ये होती.त्यामुळे राजहंस सिंह यांची वर्णी लागली आहे.

रामदास कदमांवर का नाराज ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेने सोडली तेव्हा कॉंग्रेस मध्ये जाणाऱ्यांमध्ये माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचेही नाव होते.रामदास कदम यांची ओळख तेव्हा आकम्रक नेते म्हणून होते.राणे यांच्या बरोबर तेही कॉंग्रेस मध्ये गेले असते कोकणात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली असती.त्यामुळे त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद देण्यात आले.कदम हे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत.त्यामुळे मागील सरकारच्या शिवसेनेच्या वाटेला आलेल्या मोजक्‍या मंत्र्यांमध्येही त्यांची वर्णी लागली.मात्र,आता उध्दव ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले नेते पुढे येत आहेत.त्यामुळे कदम यांना पुन्हा संधी न देण्याचा पक्षाचा पुर्वी पासनूच विचार होता.त्यातच,परीवहन मंत्री ऍड.अनिल परब यांच्या बाबतच्या कथित ऑडीट टेप मुळे त्यावर शिक्कामोर्तबच झाले.

निवडणुकीचे गणित काय ?

या निवडणुकीत 77 मतं मिळालेला उमेदवार निवडून येणार आहे.सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेनेकडे 99 मतं आहेत तर भाजप कडे 83 नगरसेवक आहेत.त्यामुळे दोन्ही पक्षाचे उमेदवार निश्‍चित निवडून येणार.

loading image
go to top