सोमवारपासून अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये होणार सुरू | Education update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school starts

सोमवारपासून अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये होणार सुरू

मुंबई : राज्यात घेण्यात आलेल्या 12 नोव्हेंबर रोजीच्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर (National editorial survey) दिवाळीच्या सुट्ट्या सलग जोडून घेतलेल्या राज्यातील अनुदानित शाळा (Granted school) आणि कनिष्ठ महाविद्यालये (junior colleges) ही सोमवारी 22 नोव्हेंबरपासून सुरू (starts from Monday) होणार आहेत. यासाठीची माहिती अनुदानित शाळा आणि शिक्षक संघटनांच्या (teachers union) प्रतिनिधी कडून देण्यात आली.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

दिवाळीच्या सुट्टीसाठी शालेय शिक्षण विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने त्यासंदर्भात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीविषयी अनुदानित खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे खाजगी आणि सरकारी शाळांनी आपली दिवाळीची सुट्टी 28 ऑक्टोबर पासून घेत शाळा 11 नोव्हेंबरपासून सुरू केल्या तर दुसरीकडे काही खाजगी शाळांनी 1 नोव्हेंबर पासून ही सुट्टी सुरू करुन 15 नोव्हेंबर पासून आपल्या शाळा ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुरू केल्या आहेत.

मात्र यात राज्यातील काही अनुदानित शाळांचा अपवाद होता. दिवाळीच्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर सलगपणे लावून घेता येतील असे आदेश स्थानिक स्तरावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढल्यामुळे या शाळांनी 12 नोव्हेंबरपासून सलग 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जोडून घेतली आहे. त्यामुळे या शाळा आता सोमवारी 22 नोव्हेंबरपासून सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे आदींनी दिली.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणनंतर शाळांना स्थानिक स्तरावर दिवाळीच्या सुट्ट्या नाताळ अथवा इतर सणांच्या काळात जोडून घेण्यासाठी मुभा देण्यात आली होती त्यासोबतच त्यांना स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले होते त्यामुळे काही शाळा या दरम्यान सुरू होऊ शकल्या नव्हत्या मात्र आता 22 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व शाळा सुरळीत होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

loading image
go to top