

Higher Order Thinking Skills help students develop critical thinking, creativity and problem-solving abilities beyond rote learning.
Sakal
डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
आजच्या माहिती, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात माहिती मिळविणे ही समस्या राहिलेली नाही. उलट, उपलब्ध माहितीपैकी योग्य माहिती कोणती, तिचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्यायांपैकी योग्य पर्याय कसा निवडावा आणि त्या आधारे नवीन कल्पना कशा सुचवाव्यात, हे अधिक महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे शिक्षणाची दिशा केवळ पाठांतर आणि माहिती साठविण्यापुरती मर्यादित न राहता ती त्यावर विचार करण्याकडे, ज्ञान निर्माण करण्याकडे आणि नवसर्जनाकडे वळली पाहिजे.