esakal | शाळेची घंटा वाजवा, 85 टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठवायची तयारी!
sakal

बोलून बातमी शोधा

school

शाळेची घंटा वाजवा, 85 टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठवायची तयारी!

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: राज्यात शाळा सुरू (School opening) झाल्या तर आपली मुले (Students) आपण शाळेत पाठवायला तयार असल्याचा प्रतिसाद तब्बल 85 टक्के पालकांनी (Parents) नोंदवला आहे. तर 16 टक्के पालक कोरोना आणि त्याच्या संसर्गाच्या (Corona Fear) भीतीमुळे आपली मुलं शाळेत पाठवण्यास अद्यापही तयार नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ( एससीईआरटी ) केलेल्या नुकत्याच ऑनलाइन सर्वेक्षणातून (Online Survey) समोर आली आहे. या सर्वेक्षणामुळे राज्यात पालक मोठ्या प्रमाणात शाळा सुरू केल्या जाव्यात, अशा मानसिकतेत आल्याचे चित्र समोर आले असल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिली. ( eighty Five percent parents agreed to allow children if school opens shows online survey)

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासह इतर इयत्तांच्या शाळा कधी सुरू होणार असा प्रश्नही समोर येेत होता. त्यामुळे एससीईआरटीने राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले आहे. सदर सर्वेक्षण सोमवार, १२ जुलै रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन परिषदेचे टेमकर यांनी केले आहे.

हेही वाचा: बापरे! तब्बल 80 हजार कोटींच्या शिक्षण फंडाच्या नावाखाली फसवणूक, दोघांना अटक

सर्व्हेक्षणाची आकडेवारी अशी

राज्यात कोरणा मुक्त गावात शाळा सुरू करण्यासाठी एससीईआरटीने http://www.maa.ac.in/survey या लिंक वर सर्वेक्षण सुरू केले आहे त्यामध्ये..

आतापर्यंत एकूण २,२५,१९४ पालकांनी आपले मत नोंदविले आहे.

यात ग्रामीण भागातून १,१८,१८२ म्हणजेच ५२.४८ % पालक

निमशहरी भागातून २३,९४८ म्हणजेच १०.६३ % पालक

शहरी भागातून ८३,०६४ म्हणजेच ३६.८९ % पालक

यात शाळेत पाठवायला तयार असणारे १,८९,०९५ म्हणजेच ८३.९७% पालक

शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे ३६,०९९ म्हणजेच १६.०३ % पालक

loading image