esakal | बापरे! तब्बल 80 हजार कोटींच्या शिक्षण फंडाच्या नावाखाली फसवणूक, दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

fraud crima

बापरे! तब्बल 80 हजार कोटींच्या शिक्षण फंडाच्या नावाखाली फसवणूक, दोघांना अटक

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : शिक्षण फंडाची (Education Fund) रक्कम अडकल्याचे सांगून घाटकोपर (Ghatkopar) येथील व्यावसायिकाची (Businessman) फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Crime Branch) दोघांना अटक केली आहे. आरोपींनी अशा प्रकारे इतरांचीही फसवणूक केल्याचा संशय असून त्याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आरोपींकडून रिझर्व बँक (RBI) व केंद्रीय मंत्रालयांच्या (Central Ministry) नावाची विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. (Mumbai Crime Branch police arrested two person For Ghakkopar businessman Fraud )

विनेष विश्वनाथ(39) व प्रसाद बोलापती(37) असे अटक आरोपीची नावे आहेत. ते आंध्रप्रदेश व बंगळुरू येथील रहिवासी आहेत. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकासोबत जुहू येथील हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. त्यात प्रसाद याने आपण आयपी मिओर्ग प्रा. लि. याचा व्यवस्थापकीय संचालक असून त्यांना 80 हजार कोटी रुपयांचा शिक्षण फंड आयपीएमआय या कंपनीकडून त्यांच्या कंपनीला मिळाल्याचे सांगितले. ही रक्कम रिझर्व बँकेत अडकली असून तिथे 50 लाखांचा खर्च केल्यास ती रक्कम काढता येईल. त्या बदल्यात तक्रारदाराला आरोपांनी सात कोटी रुपये देण्याचे कबुल केले. त्या बदली तक्रारदार यांनी आरोपींना 50 हजार रुपये आगाऊ दिले.

हेही वाचा: RIGHT TO TRAVEL: लोकल नाही कुणाच्या बापाची, ती करदात्यांच्या हक्काची

त्यावेळी तक्रारदार यांच्या मित्राला एका मित्राद्वारे आरोपी प्रसाद हा फसवणूक करणारा असून त्याने यापूर्वीही अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात नवी दिल्लीमध्ये गुन्हा दाखल असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी दोघांंना अटक केली. आरोपींकडून रिझर्व बँक, भारतीय अर्थ मंत्रालय वाणिज्य मंत्रालय, भारतीय कॉर्पोरेट मंत्रालय, परदेशी बँक व तेथील कंपन्यांच्या नावाचे बोगस कागदपत्रे सापडली आहेत. ती जप्त करण्यात आली आहेत

loading image