Eleventh Admission : दुसऱ्या फेरीत वीस हजार ६०७ विद्यार्थ्यांना मिळाले महाविद्यालय

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या फेरीत २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.
eleventh admission merit list
eleventh admission merit listsakal

पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या फेरीत २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे. त्यातील आठ हजार १०९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३२६ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ही केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आणि प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार एकूण २० हजार ६०७ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली आहेत.

शहरातील नामांकित महाविद्यालयातील दुसऱ्या फेरीचा कट-ऑफ दुसऱ्या फेरीतही ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. काही नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेपेक्षा कला शाखेचा कट-ऑफ हा चढता असल्याचे निदर्शनास येते. फर्ग्युसन महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कला शाखेचा कट-ऑफ हा विज्ञान शाखेच्या तुलनेत अधिक असल्याचे चित्र आहे.

प्रवेशासाठी बुधवारपर्यंत (ता.५) मुदत

अकरावीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या बुधवारपर्यंत (ता.५) प्रवेश घेता येणार आहे. या कालावधीत प्रवेश निश्चित करता येतील, तसेच प्रवेश रद्द किंवा नाकारता येणार आहेत. ॲलॉट झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील. परंतु विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास त्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य असेल. मात्र तरीही महाविद्यालयात प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.

शाखानिहाय महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

शाखा : विद्यार्थी संख्या

कला : २,०४६

वाणिज्य : ७,७६६

विज्ञान : १०,३१३

एचएसव्हीसी : ४८२

पसंतीक्रमानुसार महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

पसंतीक्रम : विद्यार्थी संख्या

१ : ८,१०९

२ : ४,३१६

३ : २,५३८

४ : १,६८०

५ : १,३०८

नामांकित महाविद्यालयांमधील दुसऱ्या नियमित फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) :

महाविद्यालयाचे नाव : कला : वाणिज्य : विज्ञान

सिंबायोसिस महाविद्यालय : ९२.४० टक्के : ९० टक्के : ---

लक्ष्मणराव आपटे प्रशाला : --- : ७६.८० टक्के : ९४.२० टक्के

फर्ग्युसन महाविद्यालय : ९१.२ टक्के(मराठी)/९६ टक्के (इंग्रजी) : --- : ९४.२०टक्के

बीएमसीसी : --- : ९३.८० टक्के : ---

मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर) : ८८.४० टक्के (इंग्रजी) : ८४ टक्के : ९०.४० टक्के

स.प. महाविद्यालय : ९१.८०टक्के : ८७.८० टक्के : ९०.६ टक्के

नेस वाडिया महाविद्यालय : --- : ८१.२० टक्के : ---

नौरोसजी वाडिया महाविद्यालय : ८६ टक्के : --- : ८६.४० टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com