esakal | CET : वाद न्यायालयात ! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर ?
sakal

बोलून बातमी शोधा

eleventh Admission

CET : वाद न्यायालयात ! अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर ?

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाने अकरावी प्रवेशासाठी (eleventh Admission) आयोजित केलेल्या सीईटीचा (CET) वाद न्यायालयात (court) पोहोचल्याने राज्यभरात ही सीईटी अडचणीत सापडली आहे. केंद्रीय मंडळाच्या अभ्यासक्रमाचा समावेश या सीईटीत करण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिल्याने सरकारची (government) मोठी अडचण होणार असून यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (online admission) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( eleventh CET in problems online Admission may go on waiting -nss91)

तर दुसरीकडे न्यायालयात केंद्रीय मंडळांच्या पालक आणि इतर संघटनांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याने या दरम्यान सुरू असलेली सीईटीची नोंदणी अडचणीत येईल की काय अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आह. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आणि त्यानंतर मागील आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

हेही वाचा: शिक्षण मंडळाने पालकांना परीक्षा शुल्क परत देण्याचा विचार करावा - HC

त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठीची कार्यवाही सुरू केली होती. 21 जुलैपासून राज्यात सीईटीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. परंतु सुरुवातीच्या तांत्रिक कारणामुळे हे संकेतस्थळ तब्बल पाच दिवस बंद होते. त्यानंतर 26 जुलै पासून हे संकेतस्थळ सुरू झाले असून 2 ऑगस्टपर्यंत यासाठी नोंदणीला मुदत देण्यात आली आहे. तर सीईटीची परीक्षा 21 ऑगस्ट रोजी घेण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळपर्यंत 9 लाख 91 हजार विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर अकरावी सीईटीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

दरम्यान अकरावीच्या सीईटीसाठी सीबीएसई, आयसीएसई, आयबीएसई, आयबी, आयजीसीएसई आणि एनआयओएस आदी इतर विद्यार्थ्यांनीही सीईटीसाठी नोंदणी सुरू केली असून त्यासाठी कोणत्याही अडचणी विद्यार्थ्यांना येत नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. तसेच अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया नुकतीच जाहीर करण्यात आली असून 9 ऑगस्ट पासून त्यासाठी ची वेगळी नोंदणी केली जाणार आहे मात्र अकरावी सीईटीचा विषय न्यायालयात असल्याने ही प्रवेश प्रक्रिया ही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, पुणे,नाशिक, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी चिंचवड आदी सहा महापालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जातात, यामध्ये मागील काही वर्षात इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 14 हजाराहून कमीच विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला होता. त्यामुळे केवळ काही हजार विद्यार्थ्यांसाठी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना इतर मंडळांच्या वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया ही विद्यार्थ्यांमध्ये आता उमटत आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या अकरावी प्रवेशासाठी इतर मंडळातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळातील निकष पाळणे बंधनकारक असते.त्यामुळे प्रवेश घेताना राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असायला हवी, असे मत आता राज्यातील विद्यार्थ्यांकडून व्यक्त केले जात आहे. शिवाय केंद्रीय मंडळांच्या परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांचा कधीही त्या मंडळाने विचार केला नाही ही बाब सुद्धा लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top