esakal | पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रवेशाला मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

admission

पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या प्रवेशाला मुदतवाढ

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : तंत्र शिक्षण संचालनाच्या अंतर्गत येणाऱ्या दहावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी (Engineering) व तंत्रज्ञान (polytechnic Syllabus) अभ्‍यासक्रमांच्या प्रवेशाला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ (Admission extended) देण्यात आली आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत यासाठी अर्ज (application) करता आले नाहीत, त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: मुंबईत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची दुपटीने नोंद; मृत्यूंमध्ये मात्र घट

पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यात अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन तंत्र शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन अर्ज करण्यासोबत कागदपत्रांची छाननी आदींसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी प्रवेशाच्या तात्पुरत्या याद्या जाहीर केल्या जाणार असून त्यासाठी काही सुधारणा करण्यासाठी १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत संधी दिली जाणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी ही १३ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

अशी आहे प्रवेश फेरीची रचना

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी -१ तारीख

कॅप फेरीसाठी जागांची रचना प्रसिद्ध १३ सप्टेंबर २०२१

पसंतीक्रमासाठी विकल्प निश्चित करणे १६ सप्टेंबर २०२१

कॅपच्या फेरीसाठी तात्पुरते जागा वाटप १८ सप्टेंबर २०२१

कॅपच्या फेरीतून मिळालेली जागा स्वीकृती २२ सप्टेंबर २०२१

संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे २३ सप्टेंबर २०२१

दुसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी २४ सप्टेंबर २०२१

संस्थांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करणे ६ ऑक्टोबर २०२१

loading image
go to top