esakal | मुंबईत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची दुपटीने नोंद; मृत्यूंमध्ये मात्र घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची दुपटीने नोंद; मृत्यूंमध्ये मात्र घट

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) कोरोनाचे रुग्ण (corona patients) पुन्हा वाढू लागले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत 200 च्या खाली गेलेली रुग्णसंख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. दररोज 400 च्या वर रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, मुंबईत पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत (corona second wave) दुपटीने कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंमध्ये (corona deaths) मोठ्या प्रमाणात घट झाली नोंदवण्यात आली असून ही एक दिलासादायक बाब असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे (Doctors statement) म्हणणे आहे.

हेही वाचा: 'जिद्द असावी तर अशी; व्यंगत्वावर मात करणाऱ्या शिक्षिकेची प्रेरणादायी कहाणी'

मुंबईत पहिल्या लाटेत फेब्रुवारी महिन्यापासून एकूण 2 लाख 87 हजार 899 रुग्ण सापडले होते. तर, 11 हजार 084 मृत्यू झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत दुप्पट रुग्ण सापडले आणि ही संख्या फक्त 7 महिन्यांत 4 लाख 25 हजार 739 वर पोहोचली. मात्र त्यात दिलासादायक बाब म्हणजे फक्त 4 हजार 827 मृत्यू झाले. म्हणजेच जवळपास तीन पटीने मृत्यूंमध्ये घट नोंदवण्यात आली.

चाचण्याही दुप्पट

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत चाचण्यांचे प्रमाण ही वाढवण्यात आले आहे. पहिल्या लाटेत एकूण 23 लाख 76 हजार 994 चाचण्या केल्या गेल्या. मात्र, फेब्रुवारी ते ऑगस्टपर्यंत दुसऱ्या लाटेत मुंबईत 70 लाख 551 चाचण्या केल्या गेल्या आहेत. याचा अर्थ चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसते.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली असली तरी गंभीर रुग्ण कमी आहेत. भरलेले बेड्सची संख्या ही कमी आहे. लसीकरण आणि नागरिकांमध्ये आता जागृती असून अजूनही मास्क, आणि सामाजिक अंतर राखले पाहिजे.

पहिली लाट

चाचण्या - 23,76,994

रुग्ण 287899

मृत्यू 11084

दुसरी लाट (ऑगस्टपर्यंत)

एकूण चाचण्या  70,00,551

रुग्ण 4,25,739

मृत्यू 4827

"रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. 200 वरून आपण 400 वर गेलो आहोत. मृत्युदर कमीच आहे. आता लक्ष ठेवण्याची गरज आहे. कारण, गणपतीमध्ये ही संख्या आणखी वाढू शकेल."

- डाॅ. अविनाश सुपे, सदस्य, कोविड टास्क फोर्स

loading image
go to top