स्वायत्त महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा घोषित; एनईपीनूसार प्रवेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही प्रवेश परीक्षेची घोषणा केली असून, अर्जांसाठी २० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
entrance examination of autonomous colleges announced as per NEP sppu extension
entrance examination of autonomous colleges announced as per NEP sppu extensionSakal

Pune News : शहरातील स्वायत्त महाविद्यालयांतील प्रवेश परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेला अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मे पर्यंत देण्यात आली आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात येऊ इच्छिणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश परीक्षा महत्त्वपूर्ण ठरते.

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनेक नामवंत महाविद्यालये आहेत. त्यातील काही महाविद्यालये स्वायत्त झाली असून, प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षेचेही आयोजन करतात. नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही प्रवेश परीक्षेची घोषणा केली असून, अर्जांसाठी २० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

त्याच धर्तीवर आता स्वायत्त महाविद्यालयांतही प्रवेश परीक्षा पार पडत आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील कला आणि विज्ञान शाखेतील पदव्यूत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. ज्यासाठी ३० मे पर्यंत अर्ज करता येईल. तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयानेही त्यांच्या प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे.

विज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रमांना स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, ऑनलाइन अर्जासाठी ९ जून पर्यंत मुदत आहे. वाडिया महाविद्यालयाच्या वतीनेही काही एम.एस्सी. अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. त्यासाठीही ३ जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे काय?

- सुटीच्या काळात गाफील राहू नका

- पुढच्या प्रवेशाच्या दृष्टीने ऑनलाइन प्रवेश परीक्षांची माहिती घ्या

- अनेक अर्जांची मुदत मे महिन्यातच संपत असल्याने तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा

- पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

- प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम तपासून त्या दृष्टीने तयारी करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com