exams
sakal
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
एक जुनी गोष्ट आठवली. एका तरुण साधकाने गुरूला विचारले, ‘गुरुवर्य, मी इतकी साधना करतोय, परंतु सिद्धी काही मिळत नाही. मी का मागे पडतोय?’ गुरू शांतपणे म्हणाले, ‘तुला विहीर तर खणायची आहे. परंतु रोज जागा बदलतोस. एक फूट इथे, एक फूट तिथे. म्हणूनच तुला पाणी लागत नाही. सातत्याने एकाच ठिकाणी खोदशील, तरच पाणी मिळेल.’ साधकाने ते मनावर घेतले आणि अखेर यश त्याच्या पायाशी आले.