makeup
sakal
- नरेंद्र वीर, मेकअप आर्टिस्ट
माध्यमांचा होत जाणारा विस्तार, सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपली कला सादर करण्यासाठी उपलब्ध झालेलं व्यासपीठ आणि घरगुती व व्यावसायिक कार्यक्रमांची रेलचेल, यांमुळे ‘मेकअप’बद्दलची सजगता वाढली आहे. नाटक, चित्रपट, मालिका या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रांत आता ‘मेकअप’चा वापर केला जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी अधिकाधिक व्यापक होत आहेत.