करिअर अपडेट
प्रा. विजय नवले,करिअरतज्ज्ञ
‘अजब रसायन आहे बुवा!’, ‘आमची केमिस्ट्री चांगली आहे’ अशी वाक्ये आपण ऐकतो. रसायनशास्त्र आणि त्यावर आधारित संशोधन, त्यांचा वापर अगदी जुन्या काळापासून होत आला आहे. आता मात्र आधुनिक युगात रसायनशास्त्राने मोठी प्रगती केली आहे. केमिस्ट्री हा सर्वच क्षेत्रांना व्यापलेला विषय आहे. कपडे, औषधे, रंग, सौंदर्यप्रसाधने, खते, अन्नपदार्थातील काही घटक, आधुनिक वस्तू, छपाई, पुस्तके, दागिने, पॅकिंग, युद्धसामग्री आदी सर्व ठिकाणी केमिस्ट्रीचा वापर होत असतो. त्यामुळे या विषयातील अभ्यासाला महत्व आहे.