esakal | सहकारच्या लेखापरीक्षणातील ६९२ अस्थायी पदांना मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Job

सहकारच्या लेखापरीक्षणातील ६९२ अस्थायी पदांना मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सहकार खात्यातील लेखापरीक्षण कक्षातील ६९२ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या पदांना येत्या २२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामध्ये अतिरिक्त निबंधकांसह शिपायापर्यंतच्या पदांचा समावेश आहे.

सहकार खात्यातील लेखापरीक्षण कक्षातील ६९२ अस्थायी पदांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली. परंतु ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार लेखापरीक्षण विभागाला आवश्यकतेनुसार कामे करण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक होते. त्यानुसार अतिरिक्त निबंधक, विभागीय सहनिबंधक, विशेष लेखापरीक्षक, लघुलेखक, उपलेखापरीक्षक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक आणि शिपाई पदांना मुदतवाढ मिळाली आहे.

loading image
go to top