esakal | PERA CET 2021 : अर्ज भरण्यासाठी १२ जुलैपर्यत मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

PERA CET 2021 : अर्ज भरण्यासाठी १२ जुलैपर्यत मुदतवाढ

PERA CET 2021 : अर्ज भरण्यासाठी १२ जुलैपर्यत मुदतवाढ

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : राज्यातील १४ खासगी विद्यापीठांच्या प्रीमिनन्ट एज्युकेशन ॲण्ड रिसर्च असोसिएशनच्या (Preeminent Education and Research Association - PERA India) वतीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘पेरा सीईटी २०२१’ परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत (ता.१२) मुदतवाढ दिली आहे. ही परीक्षा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाइन माध्यमातून होईल, अशी माहिती ‘पेरा’चे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.(Extension till July 12 for filling up application for Pera CET exam for admission in private universities)

खासगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ही ‘पेरा सीईटी’ घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आता सोमवारपर्यंत अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती ‘www.peraindia.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा: स्टेट बँकेत अ‍ॅप्रेंटिसच्या 6000 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

या पेरा सीईटीद्वारे विद्यार्थ्यांना एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्‍वकर्मा विद्यापीठ, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, डी.वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, स्पायसर अ‍ॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी, संदीप विद्यापीठ (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद), एमआयटी डब्ल्युपीयु युनिव्हर्सिटी (पुणे), डी.वाय. पाटील विद्यापीठ (अँबी पुणे), विजयभूमी युनिव्हर्सिटी (मुंबई), सोमय्या विद्यापीठ (मुंबई), डी.वाय. पाटील ॲग्रीकल्चर आणि टेक्निकल विद्यापीठ (कोल्हापूर) या विद्यापीठांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

loading image