esakal | स्टेट बँकेत अ‍ॅप्रेंटिसच्या 6000 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Recruitment 2021

स्टेट बँकेत अ‍ॅप्रेंटिसच्या 6000 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

sakal_logo
By
शरयू काकडे

SBI अ‍ॅप्रेंटिस अधिसूचना 2021 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी स्टेट बँक आपल्याला देत आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. भारतीय स्टेट बँकेने ०५ जुलै २०२१ ला अ‍ॅप्रेंटिसच्या पद भरतीसाठी अधिसुचना प्रकाशित केली आहे. एसबीआय अ‍ॅप्रेंटिससाठी रजिस्ट्रेशन ०६ जुलै २०२१ पासून सुरू होत आहे.

पात्र आणि इच्छूक उमेदवार एसबीआय २०२१ अ‍ॅप्रेंटिससाठी २६ जूलै २०२१ च्या आधी nsdcindia.org/apprenticeship किंवा apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers या ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकतात.

हेही वाचा: पुणे : इंजिनिअरची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

एसबीआय अ‍ॅप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी ग्रॅज्युएट असावे आणि वय २८ वर्ष पेक्षा जास्त नसावे. एसबीआय अ‍ॅप्रेंटिस भरतीसाठी यशस्वीपणे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन परिक्षेसाठी बोलावले जाईल जी ऑगस्ट २०२१ मध्ये निश्चित होईल.

एसबीआय अ‍ॅप्रेंटिस भरती महत्वपूर्ण तारखा

  • SBIअ‍ॅप्रेंटिस नोटिफिकेशनच्या तारखा : 5 जुलै 2021

  • SBIअ‍ॅप्रेंटिससाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या तारखा 6 जुलै 2021

  • SBIअ‍ॅप्रेंटिससाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021

एसबीआय अ‍ॅप्रेंटिससाठी रिकाम्या जागा - ६१००

कॅटेगरीनुसार जागा

  • सामान्य - 2577 पदे

  • ईडब्ल्यूएस - 604 पदे

  • ओबीसी - 1375 पदे

  • एससी - 977 पदे

  • एसटी - 567 पदे

एसबीआई अ‍ॅप्रेंटिस पात्रता मानदंड:

शैक्षणिक योग्यता:

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालय आणि ग्रॅज्यूएट असणे अनिवार्य

एसबीआई अ‍ॅप्रेंटिस साठी वयोमर्यादा :

२० ते २८ वर्ष (३१.१०. २०२० पर्यंत) उमेदवारांचा जन्म ०१.११. १९९२च्या आधी झालेला नसावा.

एसबीआई अ‍ॅप्रेंटिस स्टाईपेंड : रु. 15000

एसबीआई अ‍ॅप्रेंटिस भरती 2021 साठी अर्ज कसा करावा?

पात्र आणि इच्छूक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर ६ जुलै ते २६ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकता

loading image