

True success lies in balancing external achievements with inner peace. Experts highlight the importance of self-confidence, empathy, leadership, gratitude, and meditation for building a healthy personality and a peaceful mind.
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
व्यक्तिमत्त्वाचा भौतिक यशाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी पुढील गुण रुजायला हवेत.
१ आत्मविश्वास, संभाषण कौशल्ये, निर्णय क्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कुठल्याही परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व-प्रयत्नाने मिळवता येतात व वृद्धिंगत करता येतात. प्रत्येक व्यक्तीची मानसिक जडण घडण वेगवेगळी असते.
२ आंतरिक क्षमतांच्या विकासासाठी माझ्यात पुढील गुण रुजवायला हवेत.
३ समानुभूती - समोरच्याला समजून घेण्याची आणि त्याच्याशी भावना शेअर करण्याची क्षमता
४ कल्पकता आणि निर्मितीक्षमता - कल्पनाशक्ती आणि माझ्या सर्व क्षमता पूर्ण वापरून मी निर्मितीक्षम असलो/असले पाहिजे.
५ उत्कटता आणि तळमळ - माझं ध्येय गाठण्यासाठी तीव्र उत्कटता व तळमळ हवी.
६ आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं - माझी नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम असावी.
७ चांगला श्रोता - समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता माझ्यात विकसित व्हावी.
८ आपलं म्हणणं समजावून देण्याची क्षमता - तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता असावी.
९ जबाबदारी - आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता असावी.
१० नेतृत्व - कुठल्याही मानसिकतेच्या समूहाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात हवी.
११ प्रामाणिकपणा आणि मूल्य - आपल्या भूमिकेशी किंवा ठरवलेल्या मार्गाशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहायचा कणखरपणा असायला हवा.
१२ सर्वश्रुतता, सतर्कता आणि सावधपणा - आजूबाजूच्या जगात काय चाललंय, इतर स्पर्धकच नव्हे तर जागतिक सामाजिक घडामोडींविषयी मी सतर्क असायला हवं.
१३ अद्ययावत तंत्रज्ञान - जग बदलत आहे आणि तंत्रज्ञान अद्ययावत होत आहे. मला ती आत्मसात करायलाच हवी.
१४ स्वयंमूल्य मापन - मी सतत स्वत:कडे, माझ्या प्रगतीकडे आणि स्वस्थतेकडे, त्रयस्थपणे पाहून मूल्यमापन करायला हवं.