Fake Job Alert : ऑनलाइन फेक जॉब पासून सावध कसं राहणार? जाणून घ्या ट्रिक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Job Alert

Fake Job Alert : ऑनलाइन फेक जॉबपासून सावध कसं राहणार? जाणून घ्या ट्रिक्स

Fake Online Job Alert : इंटरनेट अनेकांसाठी वरदान आहे. कोरोना काळापासून याला विशेष महत्व आलं आहे. त्यात आजकाल प्रत्येक जण गरजा पूर्ण करण्यासाठी इंटरनेटवर अवलंबून आहे. एकीकडे इंटरनेट वरदान सिध्द होत आहे तर दुसरीकडे याच्या अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. यात फेब जॉबचं पण पेव फार वाढलं आहे. जाणून घेऊया.

जॉब लिस्टिंगमध्ये चुका होणं

ऑनलाइन पोस्ट करण्यात आलेल्या जॉबमध्ये शब्द व्याकरणाच्या चुका असतात. कारण कोणतीही कंपनी अशा चुका करत नाही. ती फसवणूकीच्या उद्देशाने केलेली पोस्ट असू शकते. त्यामुळे अशा लहान डिटेल्सवर ते लक्ष देत नाहीत.

हेही वाचा: Job: लवकर जॉब सोडताहेत? Quiet Quitting चा ट्रेंड होतोय व्हायरल, वाचा प्रकरण

ऑफीशियल इमेल आयडी नसणे

कोणतीही व्हेरिफाइड कंपनी कायम प्रोफेशनल कम्यूनिकेशनसाठी ऑफिशीयल इमेल आयडीचा वापर करतात. पण जर तुम्हाला कोणती जॉब ऑफर आली आणि पर्सनल इ मेल अकाउंट वरून मेसेज तर सावध रहा. अशा कोणत्याही व्यक्तीला रिस्पॉन्स देण्याआधी पूर्ण तपास करा.

हेही वाचा: Job: असा द्या Interview, 100 टक्के जॉब मिळणार

फार जास्त सॅलरी ऑफर

जर जॉबच्या तुलनेत सॅलरी जास्त ऑफर होत असेल तर सावधान व्हावं. ऑनलाइन जाहिरातीत अशा पोस्ट असतात ज्यात फक्त एक-दोन तासाच्या कामासाठी फार मोठ्या रक्कम देण्याचं आश्वासन देतात.

टॅग्स :jobOnline Job Fair