महिलांनो सावधान! खोट्या जॉबच्या ऑफर देऊन होतेय फसवणूक

fake job on internet to identify with this tips in kolhapur
fake job on internet to identify with this tips in kolhapur

कोल्हापूर : बऱ्याच वेळा इंटरनेटवर काही गोष्टी पाहत असताना महिलांना आकर्षित जॉब ऑफर्स दाखवल्या जातात. कधीकधी जॉबशी संबधित फोन कॉलही येतात. चांगला जॉब करत आहात, करियरमध्ये बढती हवी आहे का ? असे अनेक प्रश्न विचारले जातात. परंतु जॉबच्या अशा ऑफरमध्ये महिलांना अनेक प्रॉब्लेम येतात. कारण यामध्ये खूपसे जॉब हे फेक असतात. अशावेळी सावध राहणे गरजेचे असते. आपल्या कॉम्प्युटरद्वारे मिळणाऱ्या इंफॉर्मेशनचा फायदा घेऊन तुम्हांला त्रास दिला जाऊ शकतो. यासाठी नकली जॉब ऑफर्स ओळखायचे असल्यास त्या कंपनीबद्दल थोडा रिसर्च करणे, माहिती गोळा करणे गरजेचे असते. या टीप्स वापरून तुम्ही जॉब ऑफर्सची माहिती खरी किंवा खोटी आहे का हे तपासू शकता..

कंपनीच्या बाबतीत माहिती नसते 

साधारणतः नकली जॉब ऑफरमध्ये कंपनी बद्दल सविस्तर माहिती किंवा प्रोफाइल उपलब्ध नसते. ई-मेल मध्ये दिलेला फोटोही अस्पष्ट असतो. यावेळी तुम्ही अंदाज लावू शकता की या ऑफरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे फेक आहे.

विश्वसनीय कंपनी पैसे मागत नाही 

जॉबमध्ये समोरची कंपनी पैशांची मागणी करत असेल समजून जा की हा जॉब नक्कीच फेक आहे. कोणतीही कंपनी ऑफर दरम्यान प्राथमिक पातळीवर तुम्हाला ग्रॅंड ओपनिंगची किंवा भरमसाठ पगाराच्या गोष्टीवर चर्चा करत नाही. अशी चर्चा किंवा बातचीत झाली असेल तर समजून जा की, तुमच्या फोल्डरमधील स्पैम माहिती लिक होत आहे. 

नकली कंपन्यांची नावेही असतात फसवी  

अशावेळी कंपनीची खरी माहिती हवी असल्यास त्यांचा ईमेल चेक केला पाहिजे. कधी कधी कोणत्याही सुप्रसिद्ध कंपनीशी अशी नावे जुळणारी असु शकतात. अशावेळी कंपनीकडून तुम्हाला जॉब ऑफर होत असेल किंवा तसा मेल आला तर तो इ-मेल असेल. तो कधीच हॉटमेल किंवा याहू-मेल वरुन येणार नाही. अशा कंपनीच्या प्रोफाईलमध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकतात किंवा चुकीची माहिती असू शकते ज्यामुळे तुम्हाला ते ओळखून येऊ शकते.

वैयक्तिक माहितीची मागणी होत असेल तर 

सावधान जर तुम्हाला जॉब ऑफरच्या दरम्यान फोन आला आणि तुमची जन्मतारीख, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर अशा पर्सनल गोष्टी शेअर करायला सांगितल्यास समजून जा की, हा जॉब नकली आहे. साधारणत: कंपन्या सुरुवातीला उमेदवाराची पाहणी करतात. आणि सेकंडरी स्टेजमध्ये त्याची पार्श्वभूमी, माहिती पाहिली जाते. जर यादरम्यान याची मागणी होत असेल तर स्वतःला सुरक्षित ठेवा. अशा कंपन्याच्या जॉब ऑफर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com