esakal | FCI मध्ये 860 जागांसाठी बंपर भरती; 8 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज I FCI Recruitment
sakal

बोलून बातमी शोधा

FCI Recruitment
भारतीय खाद्य महामंडळानं 800 पेक्षा जास्त पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत.

FCI मध्ये 860 जागांसाठी बंपर भरती; 8 वी विद्यार्थ्यांनाही करता येणार अर्ज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

FCI Recruitment 2021 : भारतीय खाद्य महामंडळानं 800 पेक्षा जास्त पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले आहेत. तर, 8 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2021) मिळवण्याची ही मोठी संधी आहे. दरम्यान, उमेदवारांना पंजाब डेपो आणि कार्यालयांमध्ये वॉचमन (Watchman) पदासाठी भरती करण्यात येणार असून 11 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालीय.

दरम्यान, इच्छुक उमेदवार FCI च्या अधिकृत वेबसाइटवर fci-punjab-watch-ward.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी असेल.

हेही वाचा: Indian Oil मध्ये 500 हून अधिक पदांसाठी भरती; 1 लाखापर्यंत मिळणार पगार

रिक्त जागा (FCI Vacancy 2021 Details)

FCI पंजाबमध्ये वॉचमनची एकूण 860 पदे रिक्त आहेत. यात सामान्य श्रेणीतील 345 पदे, अनुसूचित जाती 249, ओबीसी 180 पदे आणि ईडब्ल्यूएसची 86 पदे समाविष्ट आहेत.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाचे 8 वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर, माजी कर्मचाऱ्यांसाठी 5 वी पास पुरेसे आहे. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा : पात्र अर्जदारांचे वय 1 सप्टेंबर 2021 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत-जास्त 25 वर्षे असावे.

हेही वाचा: केरळात लिंग बदलणाऱ्यांची संख्या वाढली; पुरुषापेक्षा 'महिला' होण्याची अधिक इच्छा

निवड प्रक्रिया : अर्जदारांची लेखी परीक्षा, शारीरिक सहनशक्ती चाचणी (पीईटी), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे भरती केली जाईल. लेखी परीक्षेत एकूण 120 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असेल. या परीक्षेत कोणतेही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.

वेतन : आयडीए पॅटर्ननुसार, एफसीआयमध्ये वॉचमन पदावर नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना 23,300 ते 64000 रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.

loading image
go to top